शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jeevan Labh Policy: LICची जबरदस्त योजना; दररोज 260 रुपयांची बचत अन् मॅच्योरिटीनंतर मिळतील 54 लाख...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 2:48 PM

1 / 7
LIC Jeevan Labh Policy: आजच्या काळात गुंतवणूकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण बहुतेक लोक सुरक्षित गुंतवणूकीसाठी सरकारी योजनेत (Government Scheme) पैसे गुंतवतात. या योजनांमध्ये गुंतवणूक करणे सोपे आणि अधिक सुरक्षित असते.
2 / 7
विम्यात गुंतवणूक करणारे बहुतेक लोक भारतीय आयुर्विमा महामंडळ(LIC) वर विश्वास ठेवतात. यात गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे असण्याची गरज नाही. कमी पैशातदेखील तुम्ही एलआयसीमध्ये गुंतवणूक करू शकता.
3 / 7
LICकडून जीवन लाभ पॉलिसी (LIC Jeevan Labh Policy) ऑफर केली जाते. हा एक नॉन लिंक्ड प्रॉफिट प्लॅन असून, यात तुम्ही कमी पैशात गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत पॉलिसीधारकाला मॅच्योरिटीनंतर बक्कळ पैसा मिळतो.
4 / 7
पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवली जाते. हा शेअर बाजाराशी संबंधीत प्लॅन नाही, यामध्ये मर्यादित कालावधीत गुंतवणूक केली जाते.
5 / 7
एलआयसीच्या जीवन लाभ योजनेत मॅच्योरीटीनंतर पॉलिसीधारकला संपूर्ण रकमेसह रिव्हर्सिंनरी बोनस आणि फायनल अॅडिशनल बोनसचा लाभ मिळतो. या योजनेत 10, 13 आणि 16 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते आणि 16 ते 25 वर्षानंतर पैसे मिळतात.
6 / 7
8 वर्षांपासून 59 वर्षांपर्यंतचा व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. जर तुमचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्ही ही पॉलिसी घेता आणि 25 वर्षांच्या मॅच्योरिटी प्लॅन घेतला, तर तुम्हाला 54 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते.
7 / 7
यासाठी तुम्हाला दररोज 260 रुपये गुंतवावे लागतील, म्हणजेच वर्षाचे 92,400 रुपये. 25 वर्षामध्ये ही रक्कम 20 लाख रुपये जमा होतील. यानंतर रिव्हर्सिंनरी बोनस आणि फायनल अॅडिशनल बोनससह तुम्हाला एकूण 50 ते 54 लाख रुपये मिळतील.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूक