शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TATA Motors, Titan मध्ये मोठी कमाई केल्यानंतर Jhunjhunwala यांची टाटांच्या आणखी एका कंपनीत गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 3:30 PM

1 / 12
Rakesh Jhunjhunwala portfolio: दिग्गज उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत टाटा समूहाच्या एका कंपनीत गुंतवणूक वाढवली आहे. राकेश झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.
2 / 12
सप्टेंबर तिमाहीत त्यांनी टाटा कम्युनिकेशन्समधीलस (TATA Communications) गुंतवणूक वाढवली. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार झुनझुनवाला यांचा कंपनीतील हिस्सा 1.04 टक्क्यांवरून 1.08 टक्क्यांवर पोहोचला आहे.
3 / 12
झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावाने या कंपनीत गुंतवणूक केली आहे. त्याच्याकडे कंपनीचे 30 लाख 75 हजार 687 शेअर्स आहेत.
4 / 12
जून तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 29 लाख 50 हजार 687 शेअर्स होते. अशाप्रकारे, बिग बुल झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे 1.25 लाख नवीन शेअर्स खरेदी केले आहेत.
5 / 12
या आठवड्यात टाटा कम्युनिकेशन्सचे शेअर्स 1440 रुपयांवर बंद झाले. या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1522 रुपये आणि सर्वात कमी स्तर 835 रुपयांचा होता. गेल्या एका आठवड्यात यामध्ये 2 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
6 / 12
एका महिन्यात यामध्ये जवळपास ६ टक्के, यावर्षी ३१ टक्क्यांपर्यंत तर गेल्या वर्षभरात कंपनीनं ६८ टक्क्यांचा उत्तम रिटर्न दिला आहे. या कंपनीचं मार्केट कॅप 41,040 कोटी रूपये आहे.
7 / 12
याशिवाय झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्सचे 1.1 टक्के हिस्सा आहे. त्यांच्याकडे कंपनीचे एकूण 3.77 कोटी शेअर्स आहेत. तर त्यांच्याकडे टायटनमधील 4.81 टक्के हिस्सा आहे. या कंपनीचे त्यांच्याकडे 4.26 कोटी शेअर्स आहेत.
8 / 12
बिग बुल राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhynwala) यांनी सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत सरकारी नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे ​​एकूण 2,50,00,000 शेअर्स खरेदी केले. हे तब्बल कंपनीच्या शेअर्सच्या 1.36 टक्के आहे.
9 / 12
भारत सरकारचा कंपनीत 51.5% हिस्सा आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार सप्टेंबर तिमाहीच्या अखेर नाल्कोमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) 15.22 टक्के हिस्सा आहे.
10 / 12
गुंतवणूकदारांची झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीवर आणि पोर्टफोलिओवर बारीक नजर असते. झुनझुनवाला यांनी जूनच्या तिमाहीत आणखी एका पीएसयू मेटल कंपनी सेलमध्ये (SAIL) 1.39 टक्के हिस्सा खरेदी केला होता.
11 / 12
नाल्कोचे बाजार भांडवल अंदाजे 18,000 कोटी रूपये इतके आहे. सोमवारी NSE वर 6.80 टक्क्यांच्या वाढीसह शेअर 102.90 रूपयांवर वर बंद झाला. 2021 च्या सुरूवातीपासूनच शेअरमध्ये तब्बल 132.02 टक्क्यांची वाढ झाली आहे.
12 / 12
झुनझुनवाला यांनी स्वतः आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या नावे गुंतवणूक केली आहे. हुरूनच्या वेल्थ लिस्टनुसार सप्टेंबरपर्यंत राकेश झुनझुनवाला आणि कुटुंबाकडे एकूण 22,300 कोटी रुपयांची संपत्ती होती. गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत तब्बल 52 टक्क्यांची वाढ झाली आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाTataटाटाshare marketशेअर बाजार