शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio 499 vs 299 प्लॅन: 200 रुपये कमी खर्च करूनही मिळतायत सारखेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 1:11 PM

1 / 7
दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा सातत्याने वाढत आहे. हेच कारण आहे की देशातील मोठी नेटवर्क प्रदाता कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त प्लॅन्स आणले आहेत. पण, जर तुम्ही थोडा विचार केलात, तर तुम्ही कमी पैशात तेवढाच डेटा आणि वैधता मिळवू शकता.
2 / 7
आम्ही रिलायन्स जिओच्या दोन रिचार्ज प्लॅनबद्दल बोलत आहोत, ज्यांच्या किमतीत 200 रुपयांचा फरक आहे. चला तर मग जाणून घेऊया जिओचे हे दोन प्लॅन कोणते आहेत आणि त्यात काय फायदे आहेत.
3 / 7
रिलायन्स जिओच्या 499 रूपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. यासोबत दररोज 2 जीबी डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉईस कॉलिंगची सुविधा, 100 एसएमएस ऑफर केले जात आहेत.
4 / 7
रिलायन्स जिओच्या या प्लॅनसोबत कंपनी Disney+ Hotstar चं एका वर्षाचं सबस्क्रिप्शन देत आहे. याची किंमत 499 रूपये आहे. याशिवाय कंपनी ग्राहकांना जिओ सिनेमा, जिओ टीव्हीशिवाय जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचाही मोफत अॅक्सेस देते.
5 / 7
रिलायन्स जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनसोबत ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय रिलायन्स जिओ या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंगही ऑफर करत आहे.
6 / 7
याशिवाय कंपनी आपल्या ग्राहकांना 100 एसएमएसही ऑफर करत आहे. या प्लॅनसोबत रंपनी एकूण 56 जीबी डेटा देत आहे. तसंच अन्य फायद्यांमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटीसारख्या अॅप्सचं सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
7 / 7
या दोन्ही प्लॅन्समधलं प्रमुख अंतर म्हणजे एका प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. 499 रूपयांच्या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. तर दुसरीकडे 299 रूपयांच्या प्लॅनमध्ये हा फायदा मिळत नाही. बाकी अन्य बेनिफिट्स सारखेच आहे.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओIndiaभारत