शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio AirFiber: आता वायरिंगचंही टेन्शन नाही, मिळणार 1Gbps चा स्पीड; किती आहे किंमत आणि कसं होईल इन्स्टॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 1:16 PM

1 / 8
रिलायन्स इंडस्ट्रीजनं गेल्या वर्षी झालेल्या एजीएममध्ये जिओ एअरफायबर सेवा सादर केली होती. ही सेवा युझर्सना वायरलेस पद्धतीनं फायबरसारखी सुविधा देणार असल्याचं त्याच्या नावावरून स्पष्ट होतं. यासाठी कंपनी 5G अँटिना वापरणार आहे. युझर्सना Jio AirFiber वर 1Gbps पर्यंत स्पीड मिळू शकतो.
2 / 8
मात्र ही सेवा सुरू करण्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. समोर आलेल्या काही रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कंपनी लवकरच ही सेवा सुरू करू शकते. एक-दोन महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया Jio AirFiber बाबत काही खास गोष्टी.
3 / 8
काही रिपोर्ट्सनुसार जिओची ही सेवा जून किंवा जुलैमध्ये सुरू होऊ शकते. याचा एक व्हिडीओही यूट्यूबवर समोर आलाय.
4 / 8
यामध्ये Jio AirFiber चं अनबॉक्सिंग आणि इंस्टॉलेशन दाखवण्यात आलंय. कंपनी काही काळापासून या सेवेची पायलट प्रोजेक्ट अंतर्गत चाचणी करत आहे. दरम्यान, हे दोन व्हेरिअंटमध्ये लाँच होण्याची शक्यता असून याची किंमत ५५०० ते ६००० रुपयांपर्यंत असू शकते. याबाबत मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
5 / 8
व्हिडीओमध्ये दोन्ही मॉडेल दाखवण्यात आले आहेत. Jio AirFiber वायफाय राउटरसह येतो, ज्यामध्ये एक अँटेना म्हणून काम करेल तर दुसरा एक्सटेंडर म्हणून काम करेल.
6 / 8
तुम्हाला यापैकी एक राउटर तुमच्या छतावर किंवा इतर कोणत्याही उंच ठिकाणी ठेवावा लागेल. तर दुसरा राऊटर तुम्हाला घराच्या आत ठेवावा लागेल.
7 / 8
हार्डवेअर प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला नेटवर्क कनेक्शन जोडून इन्स्टॉलेशन पूर्ण करणं आवश्यक आहे. यासाठी, तुम्हाला प्रथम एअरफायबरमध्ये Jio 5G सिम टाकावं लागेल आणि नंतर Jio Home अॅप डाउनलोड करा. यानंतर, तुम्हाला Jio Fiber राउटरशी कनेक्ट करावं लागेल आणि नंतर WiFi पासवर्ड टाकावा लागेल, जो राउटरच्या तळाशी लिहिलेला असेल.
8 / 8
वायरलेस कनेक्शन व्यतिरिक्त, युझर्सना Jio AirFiber मध्ये USB पोर्ट, एक LAN आणि WAN पोर्ट मिळेल. युझर्सना हवं असल्यास, ते सेट-टॉप बॉक्स Jio AirFiber शी कनेक्ट करू शकतात. ही प्रक्रिया स्टँडर्ड व्हेरिअंटसाठी आहे. पोर्टेबल व्हेरिअंटबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओ5G५जी