Jio Down: After Facebook, Jio Gandale, netizens' mimes rang
Jio Down : फेसबुकनंतर जिओ गंडले, पुन्हा नेटीझन्सचे मिम्स रंगले By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 3:49 PM1 / 13सोमवारी रात्री काही तासांसाठी फेसबुकच्या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. फेसबुक आणि इन्स्टाग्राम सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद राहिले. 2 / 13भारतीय वेळेनुसार ते ३ वाजून २४ मिनिटांनी पुन्हा सुरू करण्यात आलं. तर दुसरीकडे Whatsapp तब्बल ७ तासांनंतर म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी ४ वाजून १९ मिनिटांनी सुरू झालं. 3 / 13फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या तिन्हीवर फेसबुकचं स्वामित्व आहे. यामुळे या तिन्हीचे सर्व्हर एकमेकांशी जोडलेले आहे. फेबसुक बंद झाल्याने मार्क झुकरबर्गला ट्रोल करण्यात आलं होतं. 4 / 13सोशल मीडियावर ट्विटरचा आणि फेसबुकचा टॅग ट्रेंड करत होता, विशेष म्हणजे फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्असचे अनेक मिम्सही व्हायरल झाले होते. 5 / 13आज बुधवारी सकाळी काही वेळासाठी रिलायन्स जिओचं नेटवर्कही डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. 6 / 13त्यानंतर ट्विटरवर #jiodown ट्रेंड करत होता. अनेकांनी नेटवर्क डाऊन झाल्यामुळे सोशल मीडियावरून संतापही व्यक्त केला. तर, काहींनी मिम्स बनवत डाऊनचा आनंदही लुटला7 / 13रिलायन्स जिओचे नेटवर्क संपूर्ण देशात बाधित झालं नसलं तरी ट्विटरवरील माहितीनुसार मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि आणखी काही शहरांमध्ये ग्राहकांना समस्या जाणवत होत्या.8 / 13एक ते दीड तासांसाठी रिलायन्स जिओच्या ग्राहकांना समस्या जाणवत होत्या. जुलै महिन्यात रिलासन्स जिओच्या अॅक्टिव्ह ग्राहकांची संख्या ६१ लाखांनी वाढली. 9 / 13दरम्यान, भारती एअरटेलच्या (Bharti Airtel) च्या युझर्सच्या संख्येत २३ लाखांची वाढ झाल्याची माहिती भारतीय दूरसंचार नियामक ट्रायच्या आकडेवारीवरून समोर आलं. 10 / 13जुलैच्या अखेरिस जिओच्या मोबाईल युझर्सची संख्या ३४.६४ कोटी इतकी होती. विशेष म्हणजे यावरुनही मिम्स बनविण्यात आले आहेत. अजय देवगणचा रुबाबात असलेला फोटो व्हायरल होत आहे. 11 / 13पोलिसांना आता एवढचं काम राहिलं आहे की, त्यांनी कंपन्यांच्या नेटवर्कचा तपास करावा12 / 13रिलायन्स जिओचे नेटवर्क गायब झाल्यानंतर युजर्सने असा आराम केला13 / 13जिओ नेटवर्क गंडल्यानंतर एअरटेलसह इतर कंपन्यांचा रुबाब असाच राहिला असेल ना आणखी वाचा Subscribe to Notifications