शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio चा धमाका; नवीन Recharge Plan लाँच, Disney+ Hotstar चे मिळेल प्रीमियम सब्सक्रिप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 2:03 PM

1 / 8
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर जिओने (Jio) नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन ( Prepaid Recharge Plan) लॉन्च केले आहेत. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन रिचार्ज योजना जोडल्या आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांना Disney + Hotstar चे प्रीमियम (Premium) सब्सक्रिप्शन मिळेल.
2 / 8
या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉल, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्ससह Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. कंपनीने दोन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत.
3 / 8
दरम्यान, Disney + Hotstar च्या प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये युजर्सला 4K कंटेंट मिळते. या सबस्क्रिप्शन अंतर्गत युजर्स Disney+ Hotstar ला मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट आणि कनेक्टेड टीव्हीवर वापरू शकतात.
4 / 8
Jio च्या 1499 च्या रिचार्ज प्लॅनमध्ये, युजर्सला Disney + Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मिळते. यासोबतच प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS उपलब्ध आहेत.
5 / 8
या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याशिवाय, तुम्हाला Jio Apps चे सबस्क्रिप्शन देखील मिळते. दुसरीकडे, जर आपण 4199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोललो, तर त्यात एक वर्षासाठी Disney + Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
6 / 8
यासोबतच ग्राहकांना दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज 100 SMS मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला Jio Apps चे सब्सक्रिप्शन देखील मिळेल. दरम्यान, Disney+ Hotstar प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत 1499 रुपये आहे.
7 / 8
1499 रुपये किंवा 4199 रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला Disney + Hotstar ची प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल. यासाठी तुम्हाला एक कूपन कोड दिला जाईल, जो My Jio अकाऊंटमध्ये येईल. हा कोड वापरून तुम्ही एका वर्षासाठी फ्री सर्व्हिस मिळवू शकता.
8 / 8
यासाठी तुम्हाला https://www.hotstar.com/in/subscribe/promo वर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या Jio नंबरने साइन इन करावे लागेल आणि नंतर OTP टाकावा लागेल. यानंतर यूजर्सला युनिक कूपन कोड टाकावा लागेल. कन्फर्मेशननंतर, तुमचे सबस्क्रिप्शन अॅक्टिव्ह होईल.
टॅग्स :JioजिओMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय