शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:02 PM

1 / 6
नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ दिवाळी ऑफर म्हणून मोफत इंटरनेट सुविधा देत आहे. याआधी सप्टेंबरमध्येच कंपनीने एअरफायबरसोबत 1 वर्षासाठी मोफत इंटरनेट प्लॅन आणला होता.
2 / 6
त्याचबरोबर दिवाळीपूर्वी जिओने अनेक खास प्लॅन आणले आहेत. यापैकी एक असा प्लान देखील आहे, जो ग्राहकांना अनलिमिटेड डेटा प्लॅन ऑफर करत आहे. अशा स्थितीत ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेट वापरण्याची संधी मिळू शकते.
3 / 6
रिलायन्स जिओचा 101 रुपयांचा हा प्लॅन एअरटेल आणि व्होडाफोन आयडियासारख्या टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देऊ शकतो. या 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्स अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकतात. मात्र, प्लॅनच्या अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ फक्त तेच ग्राहक घेऊ शकतात, ज्यांच्या क्षेत्रात जिओची 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
4 / 6
रिलायन्स जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 101 रुपयांमध्ये 4G कनेक्टिव्हिटीसह 6GB डेटा दिला जात आहे. हा ट्रू अनलिमिटेड अपग्रेड्स प्लॅन आहे. त्यामुळे हा प्लॅन निवडक रिचार्ज प्लॅनसह वापरला जाऊ शकतो.
5 / 6
तुम्हाला हा रिचार्ज प्लॅन 1.5 जीबी प्रतिदिन देणाऱ्या प्लॅनसोबत घ्यावा लागेल. तुम्ही अशा प्लॅनसह रिचार्ज करू शकता, ज्यामध्ये दररोज 1.5 GB डेटाचा लाभ मिळतो आणि त्याची व्हॅलिडिटी जवळपास 2 महिने असते.
6 / 6
ज्या ग्राहकांकडून दररोज 1 ते 1.5 GB डेटा वापरला जातो. त्यांना अधिक इंटरनेटची आवश्यकता आहे, ते या प्लॅनचा लाभ घेऊ शकतात आणि 101 रुपयांच्या प्लॅनचा घेऊन ते अतिरिक्त डेटा वापरू शकतात.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJioजिओtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय