शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फ्री ट्रायलसोबत JioFiber चे नवे प्लॅन लाँच, OTT अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 3:23 PM

1 / 8
रिलायन्स जिओने JioFiber चे नवीन प्लॅन लाँच केले आहेत. न्यू इंडियाचा नवा जोश या नावाने कंपनीने हे प्लॅन सुरु केले आहेत. याअंतर्गत कंपनी एक महिन्यासाठी फ्री ट्रायल देईल.
2 / 8
ही ट्रायल केवळ नवीन ग्राहकांसाठी असेल. यापैकी दोन प्लॅनसह 11 ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.
3 / 8
कंपनीने असे म्हटले आहे की, जर ट्रायलनंतर कनेक्शन आवडले नाही, तर कंपनी काहीच बोलणार नाही आणि आपण कनेक्शन काढून टाकू शकता. कंपनीने चार नवीन प्लॅन आणले आहेत.
4 / 8
ट्रायल ऑफरमध्ये 150 एमबीपीएस वेग मिळेल. युजर्सला सेट टॉप बॉक्स आणि 10 ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन दिले जाईल. यात व्हॉईस कॉलिंग देखील आहे.
5 / 8
15 ते 31 ऑगस्ट दरम्यान जियो फायबर कनेक्शन घेणाऱ्या युजर्संना MyJio अॅपद्वारे ट्रायलचा लाभ मिळेल. ही ट्रायल ऑफर 1 सप्टेंबरपासून कनेक्शन घेणार्‍या युजर्ससाठी आहे.
6 / 8
नवीन चार प्लॅन 399 रुपये, 699 रुपये, 999 रुपये आणि 1,499 रुपयांचे आहेत. 399 रुपयांच्या मासिक प्लॅनमध्ये 30 एमबीपीएस स्पीड मिळेल आणि व्हॉईस कॉलिंग सुद्धा आहे. 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये स्पीड100 एमबीपीएस आणि व्हॉईस कॉलिंग आहे.
7 / 8
999 रुपयांच्या प्लॅनसोबत 150 एमबीपीएसचे स्पीड आहे आणि या प्लॅनसोबत 11 ओटीटी अ‍ॅप्सची सब्सक्रिप्शन दिली जाईल. 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबीपीएसचे स्पीड दिले जाईल. तसेच, 12 ओटीटी अ‍ॅप्सची सब्सक्रिप्शन दिले जाईल.
8 / 8
टॉप 1,499 रुपयांच्या प्लॅनसोबत युजर्सला जो ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन मिळणार. यामध्ये Netflix, Amazon, Disney+Hotstar शिवाय Boot, Alt Balaji आणि Sony Liv अॅप आहे.
टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ