शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नोकरी गेली तरी आता EMI चं नो-टेन्शन! जबरदस्त उपाय सापडला, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 3:24 PM

1 / 9
येत्या काळात बाजारात नेमका काय बदल होईल हे काही सांगता येत नाही. कारण सध्याचा काळ खूप कठीण मानला जात आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जगभरात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेकांना कमी पगारात काम करावं लागलं.
2 / 9
इतकी वर्ष एखाद्या कंपनीसाठी जीवाचं रान करुन कम केल्यानंतरही कंपनी आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवेल अशी वेळ आपल्यावर येईल असंही अनेकांना वाटलं नव्हतं. पण कोरोनाच्या प्रकोपामुळे भल्याभल्यांना धक्का दिला.
3 / 9
ज्यांच्यावर कर्जाचं ओझं होतं त्यांना नोकरी गेल्याचा मोठा धक्का बसला. बँकेचे EMI कसे द्यायचे असा यक्षप्रश्न निर्माण झाला. पण याच संकटावर मात करण्याची एक योग्य पद्धत आहे. नेमकं काय करता येईल ते जाणून घेऊयात...
4 / 9
पॉलिसीबाजारच्या एका ब्लॉगनुसार, अनेक कंपन्यांनी जॉब इन्श्युरन्स पॉलिसी (Job Insurance Policy) विकण्यास सुरुवात केली आहे. ही पॉलिसी ग्राहक आणि त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटातून मुक्त करण्यास खूप लाभदायक ठरते.
5 / 9
जर अचानक तुमची नोकरी गेली तर अशवेळी इन्श्युरन्स तुमच्यासाठी खूप मोठं वरदान ठरू शकतं. नोकरी सुटल्यानंतरही तुम्ही तुमच्य सर्व आर्थिक गरजा पूर्ण करू शकता आणि EMI चं देखील टेन्शन राहणार नाही.
6 / 9
भारतात अद्याप स्टँडअलोन जॉब इन्श्युरन्स प्लान लॉन्च झालेला नाही. पण रायडर बेनिफिटच्या माध्यमातून याचा लाभ घेता येऊ शकतो. विमाधारकाला फक्त आपल्या पॉलिसीमध्ये जॉब कव्हर घेता येऊ शकतो.
7 / 9
जॉब कव्हरमध्ये कोणतीही गंभीर स्वरुपाची दुर्घटनेमुळे नोकरी गेल्यास याअंतर्गत मदत केली जाते. यात काही कंपन्या वैयक्तिक कर्जासाठी देखील विमा कव्हर देतात. नोकरी गेल्यानंतर पुढील काही काळ विमा कंपन्या तुमचे EMI भरते.
8 / 9
दरम्यान, या पॉलिसीचा लाभ अद्याप सर्वांसाठी उपलब्ध झालेला नाही. यासाठी काही नियम व अटी विमा कंपन्यांनी ठेवल्या आहेत. तुम्ही जर नोंदणीकृत कंपनीचे कर्मचारी असाल तरच जॉब इन्श्युरन्सचा लाभ घेऊ शकता.
9 / 9
तुम्ही एखाद्या कंपनीत जर Contractual, Temporary, Seasonal किंवा Casual पद्धतीवर काम करत असाल तर याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. तसंच कंपनीतील तुमचं वाईट काम आणि गैरवर्तणुकीमुळे तुम्हाला काढण्यात आलं असेल तरी तुम्हाला विमा मिळणार नाही. तसंच प्रोबेशन पिरियडमधून काढून टाकलं किंवा स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली असेल तर या सुविधेचा लाभ मिळणार नाही.
टॅग्स :jobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या