शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Zerodha मध्ये नोकरीची संधी, १०-२० लाख सॅलरी; Nikhil Kamath यांनी सांगितलं कशी हवीये व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:01 AM

1 / 12
फायनॅन्शिअल सर्व्हिसेस झिरोधा ब्रोकिंग लि. (Zerodha Broking Ltd) एका एक्झिक्युटिव्ह असिस्टंटच्या शोधात आहे. बिझनेस, इनव्हेस्टमेंटला मॅनेज करणारी आणि कंपनीच्या प्रोजेक्ट्सवर नजर ठेवू शकणाऱ्या व्यक्तीची सध्या कंपनीला गरज आहे.
2 / 12
विशेष म्हणजे या पोस्टवर आणखी पुढे जाण्याचीही दाट शक्यता आहे. तसेच पॅकेजही उत्तम आहे. या पदासाठी १०-२० लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. झिरोदाचे निखिल कामथ यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भातील माहिती पोस्ट केली आहे. निखिल कामत यांच्या मते या पदासाठी अनेक प्रकारच्या स्कील्सची आवश्यकता आहे.
3 / 12
'एक रॉकस्टार #EA चा शोध सुरू आहे. जो व्यवसाय/गुंतवणूकीला मॅनेज करू शकेल, प्रोजक्ट्स नेतृत्व करू शकेल आणि त्यांची देखरेख करू शकेल,' असं ट्वीट कामत यांनी केलंय. याशिवाय उद्योजक असण्यासोबतच लेखन, संवाद आणि वेळेचे व्यवस्थापन यासारखी कौशल्ये असणे महत्त्वाचे आहे.
4 / 12
त्यांनी नोकरीसाठी मूलभूत माहितीदेखील दिली आहेत. कामत म्हणाले, हा एक सामान्य मिल जॉब नाही. यामध्ये पुढे जाण्याची भरपूर क्षमता आहे. पात्रता, वय, जेंडर महत्त्वाचं नाही. सीटीसी वार्षिक १०-२० लाख आहे. इच्छुक उमेदवार त्यांच्या अधिकृत हँडलवरील ट्विटमध्ये दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात.
5 / 12
यापूर्वी झिरोदाचे नितीन कामत यांनी तरुणांना गुंतवणूकीच्या काही टीप्स दिल्या होत्या. मी २१ वर्षांचा होतो तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला आणि त्या धक्क्यातून तसंच मी घेतलेल्या कर्जातून सावरण्याचा प्रयत्न केला. यातून आपल्याला जीवनाचे अनेक धडे मिळाल्याचे कामत म्हणाले. याशिवाय आपण मारवाडी समाजातील काही लोकांच्या सोबत राहून ट्रेडिंगची माहिती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. 'मी लहान असताना माझे वडील बँकेत काम करत होते आणि त्या काळातील सर्व लोकप्रिय IPO मध्ये गुंतवणूक केली होती,” अशी माहितीही कामत यांनी दिली.
6 / 12
जरी ते सक्रिय गुंतवणूकदार नसले तरी ते घरी आपल्या गुंतवणूकीबाबत चर्चा करत होते. घरी होत असलेल्या या चर्चेने गुंतवणूक आणि ट्रेडिंगच्या प्रवासासाठी प्रेरणा दिल्याचं भारतातील सर्वात मोठं स्टॉक ब्रोकिंग हाऊस झिरोदाचे संस्थापक नितीन कामत यांनी सांगितलं. कामत यांनी १७ व्या वर्षीच स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली आणि २१ व्या वर्षापर्यंत मोठी रक्कम जमाही केली होती. 
7 / 12
हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्रॅश (Y2K) होण्यापूर्वीचे होते आणि त्याने त्यांचं सर्व भांडवल गमावलं. मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या तुलनेत मी लागलेल्या झटक्यांमुळे अधिक शिकलो असंही त्यांनी स्पष्ट केलं. इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अभ्यासाच्या वेळी अभ्यास करणं आणि नवी स्किल मिळवण्यासाठी गुंतवणूक करणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. मनी कंट्रोलशी बोलताना कामत यांनी तरुणांना काही टीप्सही दिल्या.
8 / 12
तरुण वयात तरुणपणाचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे. परंतु पॉकेटमनीतील छोट्या भागांमधून गुंतवणूकीची सवय लावून घेणंही महत्त्वाचं आहे. सुरूवातीच्या काळात केवळ सेव्हिंग आणि गुंतवणूकीलाच सवय बनवणं हेच ध्येय असावं असं त्यांनी सांगितलं.
9 / 12
जर तुम्हाला बास्केटबॉल आवडत असेल तर त्याचं तिकिट खरेदी करा आणि ते पाहा. कोणत्याही कॉलेजमध्ये शिक्षण घेत असेलल्या विद्यार्थ्यानं पॉकेटमनीचा वापर आयफोन खरेदी करु नये. त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ सुधारत नाही.
10 / 12
म्युच्युअल फंडामध्ये अल्प प्रमाणात गुंतवणूक करणे हा आर्थिक शिस्त विकसित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. वृत्तपत्रांचा मागोवा घेऊन इंडेक्स फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला बाजाराचे स्वरूप समजण्यास मदत होईल.
11 / 12
वेगवेगळ्या गोष्टी करून पाहणे आणि प्रयोग करणे महत्त्वाचे असले, तरी हे कर्ज घेऊन करू नये, हेही समजून घेणे आवश्यक आहे. उत्सुकता हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे जे एखाद्याला कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी विकसित करणे आवश्यक आहे.
12 / 12
मला माझ्या सहा वर्षांच्या मुलाला हेच सांगायचे आहे. अनेक लोक पैशावर जास्त भर देऊन याला मोठी चूक करतात. केवळ इक्विटी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा आग्रह धरू नका. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. कौशल्य विकासावर भर द्या, असंही कामत म्हणाले.
टॅग्स :businessव्यवसायjobनोकरी