शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ २ लाखांचं डाऊनपेमेंट आणि घरी न्या Tata Tigor EV, पाहा किती भरावा लागेल ईएमआय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 3:33 PM

1 / 8
इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स इलेक्ट्रीक SUV Nexon EV आणि इलेक्ट्रीक हॅचबॅक Tigo EV तसेच इलेक्ट्रिक सेडान Tigor EV ग्राहकांना ऑफर करत आहे. आजकाल बरेच लोक सोप्या फायनान्स ऑप्शन्सवर इलेक्ट्रीक कार खरेदी करत आहेत.
2 / 8
अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वतःसाठी टिगोर इलेक्ट्रीक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तुम्ही फक्त 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून तुम्ही नवी कोरी टिगोर EV आपल्या घरी नेऊ शकता.
3 / 8
या इलेक्ट्रीक कारबद्दल सांगायचे झाले टाटा टिगोर इलेक्ट्रीक XE, XT, XZ+ आणि XZ Plus LUX सारख्या 4 व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आली आहे. Tigor EV ची किमती 12.49 लाख रुपयांपासून ते 13.75 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहेत.
4 / 8
या इलेक्ट्रीक सेडानमध्ये 26kWh बॅटरी देण्यात आली आहे, जी एका चार्जवर 306 किलोमीटरपर्यंत धावू शकते. टिगोर ईव्ही लूक आणि फीचर्सच्या बाबतीतही चांगली आहे. या इलेक्ट्रीक कारमध्ये तुम्ही तुमच्या घरी 10 तासांत पूर्ण चार्ज करू शकता. त्याच वेळी, फास्ट चार्जिंग पॉईंटवर केवळ एका तासात ही कार 80 टक्के चार्ज होऊ शकते.
5 / 8
Tigor EV XE व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आणि ऑन-रोड किंमत 13,08,444 रुपये आहे. तुम्ही Tigor EV XE व्हेरिअंटसाठी 2 लाख रुपयांचे डाऊनपेमेंट करू शकता. 2 लाख रुपयांचे डाऊनपेमेंट केल्यानंतर तुम्हाला 11,08,444 रुपये कर्जाची रक्कम मिळेल. जर व्याज दर 9 टक्के असेल आणि कर्जाची मुदत 5 वर्षे असेल, तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी दरमहा 23,009 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. जर तुम्ही लोनवर ही कार घेतली तर तुम्हाला जवळपास पावणे तीन लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात द्यावे लागतील.
6 / 8
Tata Tigor EV XT व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 13,60,116 रुपये आहे. तुम्ही Tigor EV XT व्हेरिअंट 2 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह लोनवर घेतल्यास तुम्हाला 11,60,116 रुपये कर्जाची रक्कम मिळेल. जर व्याज दर 9 टक्के असेल आणि कर्जाची मुदत 5 वर्षे असेल, तर तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी मासिक हप्ता म्हणून 24,082 रुपये द्यावे लागतील. Tigor EV XT लोन वर घेतल्यास तुम्हाला व्याजाच्या रुपात 2.85 लाख रुपये द्यावे लागतील.
7 / 8
Tata Tigor EV XZ Plus व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 13.49 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 14,11,788 रुपये आहे. तुम्ही Tigor EV ची हे व्हेरिअंट 2 लाख रुपयांचे डाउनपेमेंट खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला 12,11,788 रुपये कर्ज घ्यावे लागेस. जर व्याज दर 9 टक्के असेल आणि कर्जाची मुदत 5 वर्षांपर्यंत असेल, तर तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी मासिक हप्ता म्हणून 25,155 रुपये भरावे लागतील. Tigor EV XZ Plus व्हेरिअंटसाठी व्याजाच्या रुपात तुम्हाला 3 लाख रुपये भरावे लागतील.
8 / 8
Tata Tigor EV XZ Plus लक्झरी व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 13.75 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 14,38,658 रुपये आहे. तुम्ही Tigor EV XZ Plus लक्झरी व्हेरिअंट 2 लाख रुपयांच्या घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 12,38,658 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर व्याज दर 9 टक्के असेल आणि कर्जाचा कालावधी 5 वर्षे असेल, तर तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी ईएमआय म्हणून 25,713 रुपये द्यावे लागतील. Tigor EV XZ Plus लक्झरी व्हेरियंटसाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात 3 लाखांपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागेल. दरम्यान, Tigor EV ला फायनॅन्स करण्यापूर्वी, तुम्ही टाटा मोटर्स डीलरशिपला भेट देऊन फायनॅन्स डिटेल्स तपासणे आवश्यक आहे.