शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ एक रुपया द्या आणि स्कुटी, बाईक घेऊन जा; या बँकेने दिलीय भन्नाट ऑफर

By बाळकृष्ण परब | Published: September 24, 2020 9:46 AM

1 / 7
नवरात्र, दसरा, दिवाळीच्या सणांना आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे. या सणासुदीच्या दिवसांत बाईक किंवा स्कुटी घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी खुशखबर आली आहे.
2 / 7
फेडरल बँकेने सणासुदीच्या दिवसांमध्ये दुचारी खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी एक विशेष ऑफर दिली आहे. या ऑफरमध्ये केवळ एक रुपया देऊन दुचाकी खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊयात या विशेष योजनेबाबत.
3 / 7
फेडरल बँकेने ग्राहकांना डेबिट कार्ड ईएमआय वर दुचाकी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच फेडरल बँकेचे कार्ड असलेल्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
4 / 7
या सुविधेच्या माध्यमातून या बँकेचे ग्राहक हीरो मोटोकॉर्प, होंडा मोटारसायकल आणि टीव्हीएस मोटरच्या देशभरात असलेल्या ९४७ शोरूमपैकी कुठल्याही शोरुममधून एक रुपयाच्या पेमेंटवर दुचाकी खरेदी करू शकतील.
5 / 7
फेडरल बँकेने दिलेल्या माहितीनुसार यासाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्रे तयार करावी लागणार नाहीत. ही पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया आहे. तसेच त्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग फी सुद्धा आकारली जाणार नाही. डेबिट कार्ड ईएमआयसाठी बँकेचे ग्राहक ३, ६, ९ आणि १२ महिन्यांच्या पर्याय निवडू शकतील.
6 / 7
फेडरल बँकेचे ग्राहक या सुविधेसाठी पात्र आहेत की नाही याची माहिती घेण्यासाठी DC स्पेस EMI लिहून ५६७६७६२ वर एसएमएस पाठवावा लागेल. ग्राहकांना वाटल्यास ते ७८१२९००९०० या क्रमांकावर मिसकॉल देऊन माहिती घेऊ शकतात.
7 / 7
तसेच ग्राहक होंडा मोटारसायकलच्या स्कूटर किंवा बाईकच्या खरेदीवर फेस्टिव्ह ऑफरअंतर्गत ५ टक्के कॅशबॅकची संधीसुद्धा मिळवू शकतात. त्यासाठी किमान खरेदी रक्कम ३० हजार रुपये असणे आहे. तसेच एका कार्डवर अधिकाधिक ५ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbikeबाईकbusinessव्यवसायhero moto corporationहिरो मोटो कॉर्पHondaहोंडा