kerala becomes first state to introduce uniform gold price based on bank rate
Uniform Gold Price लागू, आता 'या' राज्यातील प्रत्येक दुकानात सोन्याचा एकच भाव, ग्राहकांना होणार 'असा' फायदा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:27 PM1 / 8तुम्ही सोने (Gold) किंवा सोन्याचे दागिने (Jewellery) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सोने खरेदी करायला गेल्यावर वेगवेगळ्या शहरातल्या दुकानात सोन्याचे भावही वेगवेगळे असल्याचे पाहायला मिळते. पण, केरळमध्ये (Kerala) आता हे चालणार नाही. 2 / 8केरळमधील प्रत्येक शहरातील सर्व दुकानांमध्ये एकाच किमतीत सोने मिळणार आहे. दरम्यान, युनिफॉर्म गोल्ड प्राइस (Uniform Gold Price) लागू करणारे हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. Uniform Gold Price लागू झाल्यानंतर आता केरळमध्ये सोन्याचे दर बँक रेटनुसार निश्चित केले जातील. 3 / 8सर्व शहरातील प्रत्येक दुकानात सारख्याच दराने सोन्याची विक्री केली जाईल. पण, हा नियम 916 शुद्धतेच्या 22 कॅरेट सोन्यावरच लागू असणार आहे. विशेष म्हणजे देशातील सोन्याची किंमत राज्ये आणि शहरांनुसार बदलते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावरील किमती, सोन्याची मागणी आणि आगामी काळात अपेक्षित बदल याच्या आधारावर निश्चित केल्या जातात. पण, ज्वेलर्स एकाच राज्यात वेगवेगळ्या किमतीत विकतात.4 / 8केरळस्थित आघाडीच्या ज्वेलर्स मलबार गोल्ड अँड डायमंड्स (Malabar Gold & Diamonds), जायअलुकास (Joyalukkas) आणि कल्याण ज्वेलर्सने (Kalyan Jewellers) गेल्या आठवड्यात बँक दराच्या आधारे ग्राहकांना सोने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सोन्याच्या खरेदीत केरळ अव्वल आहे आणि येथे सर्वाधिक सोने खरेदी केले जाते. 5 / 8लग्नसराईच्या हंगामात एकाच किमतीत सोन्याची भेट ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (India Bullion & Jewellers Association) ही माहिती शेअर केली आहे की, सोन्याचा एकसमान दर लागू करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य बनले आहे. 6 / 8याआधी, गेल्या आठवड्यात केरळमधील 'वन इंडिया वन गोल्ड रेट' धोरणाबाबत मलबार समूहाचे अध्यक्ष एमपी अहमद म्हणाले होते की, हे पाऊल राज्यभरातील सोने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यास आणि किमतींमध्ये पारदर्शकता आणण्यास मदत करेल.7 / 8मंगळवारी 916 शुद्धतेच्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,435 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दरम्यान, सोन्याची शुद्धता कॅरेटच्या आधारे ठरवली जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. मात्र, दागिने तयार करण्यासाठी ते क्वचितच वापरले जाते. 8 / 8तर दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जाणार आहे. तसेच, एकसमान किमतीत सोने मिळाल्याने ग्राहकांना फायदा होईल, असे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications