शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दररोज फक्त ५ रुपये खर्च व ३६५ दिवसांची वैधता; 'हे' भन्नाट प्लान पाहा

By देवेश फडके | Published: February 15, 2021 5:07 PM

1 / 10
टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे. ग्राहकांना, युझर्सना आकर्षित करण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून एकापेक्षा एक दमदार प्लान सादर केले जात आहेत. Airtel आणि Vodafone Idea (Vi) या कंपन्यांनी ग्राहकांसाठी भन्नाट प्लान सादर केले आहेत.
2 / 10
तुम्हाला डेटा कमी आणि जास्त वैधता असलेले प्रीपेड प्लान एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया कंपन्यांनी आणले आहेत. १५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे तसेच ३६५ दिवसांची वैधता असलेले एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाच्या विशेष प्लान संबंधी जाणून घ्या...
3 / 10
Airtel आणि Vi चे १५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्लान वर्षभराची म्हणजेच ३६५ दिवसांची वैधता देतो. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा युझर्सना ऑफर केली जाते.
4 / 10
Airtel आणि Vi च्या प्लानमध्ये युझर्सना २४ जीबी डेटा ऑफर केला जातो. एकंदरीत आढावा घेतल्यास या प्लानचा दररोजचा खर्च फक्त ४.१० रुपये आहे.
5 / 10
एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या प्लानमध्ये ३ हजार ६०० एसएमएस ऑफर केले जातात. अन्य बेनिफिटमध्ये व्हीआय मूव्हीज अँड टीव्हीचे फ्री अॅक्सेसही दिले जात आहेत.
6 / 10
एअरटेलच्या १,४९८ रुपयांचा प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता दिली जाते. या प्लानमध्ये युझर्संना २४ जीबी डेटा दिला जातो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ३,६०० एसएमएस ऑफर केले जातात.
7 / 10
एअरटेलच्या प्रीपेड प्लानमध्ये फ्री हेलोट्यून्स, Airtel Xstream Premium, विंक म्यूझिक, १ वर्षासाठी Shaw Academy चे फ्री ऑनलाइन कोर्स आणि FasTag खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक ऑफर दिला जातो.
8 / 10
Vi च्या १,४९९ रुपयांच्या प्लानमध्ये संपूर्ण वर्षाची वैधता ऑफर केली जाते. या प्लानध्ये युझर्संना २४ जीबी डेटा दिला जातो. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.
9 / 10
Vi च्या १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३,६०० एसएमएस ऑफर केले जातात. अन्य बेनिफिटमध्ये व्हीआय मूव्हीज अँड टीव्हीचे फ्री अॅक्सेस दिले जाते.
10 / 10
व्होडाफोन-आयडियाच्या प्लानची तुलना केल्यास Vi प्लानमध्ये युझर्संना केवळ एकच बेनिफिट ऑफर केला जातो. मात्र, एअरटेलच्या प्रीपेड प्लानमध्ये ६ प्रकारची बेनिफिट्स ऑफर केली जातात.
टॅग्स :MobileमोबाइलAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया