शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nirmala Sitharaman Husband Dr Parakala Prabhakar: निर्मला सीतारामन यांचे पती काय करतात? आहेत कट्टर मोदी विरोधक; कॅबिनेटमंत्री म्हणून केलेय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 10:15 AM

1 / 10
आताच्या घडीला देशात बेरोजगारी, मंदीचे सावट, महागाई, गरीब-श्रीमंतात वाढत चाललेली दरी अशा अनेकविध समस्या, अडचणी देशासमोर आहेत. देशातील आव्हानांना समर्थपणे तोंड देत देशाची अर्थव्यवस्था पुढे जात आहे. या आव्हानांना खंबीरपणे सामोरे जात देशाचा आर्थिक डोलारा सांभाळत असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman Husband Dr Parakala Prabhakar) यांचे अनेकदा कौतुक केले जाते.
2 / 10
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कामाचे देशातच नव्हे तर परदेशातही कौतुक होत आहे. त्या नेहमीच नवनवीन आव्हानांशी लढताना दिसतात. निर्मला सीतारामन भाजपच्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री असल्या, तरी त्यांचे पती मात्र कट्टर काँग्रेस समर्थक असून, मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर त्यांनी टीका केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या पतीचे नाव डॉ. परकला प्रभाकर आहे.
3 / 10
डॉ. परकला प्रभाकर यांनी आपल्या लेखणीतून अनेक वेळी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील नरसापुरम येथे जन्मलेल्या परकला प्रभाकर यांच्या आई आंध्र प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. तर त्यांचे वडील परकला शेषावताराम हे दीर्घकाळ आंध्र प्रदेश विधानसभेचे आमदार होते.
4 / 10
डॉ. परकला प्रभाकर हे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते. याच कारणामुळे राव जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर युथ डेव्हलपमेंटमध्ये विशेष योगदान देण्यासाठी परकला प्रभाकर यांची विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
5 / 10
काँग्रेस पक्षानेही त्यांना फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाच्या पूर्ण अधिवेशनात पक्षाचे प्रतिनिधी म्हणून पॅरिसला पाठवले होते. २०१४ ते २०१८ या काळात डॉ. प्रभाकर यांनी आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री-स्तरीय पोस्ट संपर्क सल्लागार म्हणून काम केले. डॉ. परकला प्रभाकर आंध्र प्रदेशच्या प्रजा राज्यम पक्षाच्या संस्थापकांपैकी एक आहेत.
6 / 10
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना सीतारामन यांची ओळख डॉ. परकला प्रभाकर यांच्याशी झाली. दोघांचे शिक्षण सोबत झाले. १९८६ साली निर्मला सीतारामन आणि डॉ. परकला प्रभाकर हे विवाहबंधनात अडकले. डॉ. परकला प्रभाकर यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकोनॉमिक्स येथून डायरेक्टरेटचे शिक्षण घेतले. उत्तम वक्ते व बुद्धिजीवी म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र आहे.
7 / 10
भारतात सन २०१९ साली आर्थिक मंदीच्या चर्चांनी जोर धरला होता. केंद्र सरकार आपल्या आर्थिक धोरणांमुळे सातत्याने टीकेचे धनी ठरत होते. याच विरोधकांमध्ये निर्मला सीतारामन यांचे पती आपल्या लेखणीतून अग्रस्थानी होते. केंद्र सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी आखलेल्या धोरणांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
8 / 10
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात म्हणाले की, कोरोना संकटात वंचितांना मदत करण्याऐवजी सरकार हेडलाइन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त आहे आणि स्वतःच्या पाठीवर थाप मारत आहे. दुसरीकडे, द हिंदूमध्ये लिहिलेल्या लेखामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
9 / 10
या लेखात त्यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. नेहरूंच्या समाजवादी धोरणांवर टीका करण्याऐवजी त्यांनी नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या अर्थव्यवस्थेचा अवलंब करावा, असा सल्ला त्यांनी आपल्या लेखात दिला होता.
10 / 10
निर्मला सीतारामन यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय कारर्किदीला प्रारंभ केला. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून २०१० साली सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली. नरेंद्र मोदींचा २०१४ साली ऐतिहासिक विजय झाला. मोदी सरकारच्या आताच्या कार्यकाळात सीतामन यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023nirmala sitharamanनिर्मला सीतारामन