शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Railways Rule: रेल्वेनं प्रवास करता; मग तुम्हाला माहीत असायलाच हवा मिडल बर्थसंदर्भातील रेल्वेचा 'हा' कडक नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 2:32 PM

1 / 10
आपण रेल्वेने प्रवास करत असाल तर, आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तिकीट बुकिंग वेळी (Train Ticket Booking), आपल्याकडे बर्थ निवडण्याचा पर्याय असतो. पण प्रत्येक वेळी मनाप्रमाणेच बर्थ मिळेल, असे होत नाही. खरे तर रेल्वेकडेही मर्यादीतच सीट्स असतात.
2 / 10
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने बर्थसंदर्भात काही नियम (Indian Railways rules) केले आहेत. आपल्याला प्रवासापूर्वी या नियमांची माहिती असणे आणि तिचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे.
3 / 10
प्रवासावेळी मीडिल बर्थ - आपल्याला प्रवासादरम्यान मिडल बर्थ मिळाला असेल, तर अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. लोअर बर्थअसलेले प्रवासी अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत बसलेले असतात. अशा स्थितीत मिडल बर्थ असलेल्या नागरिकांना रेल्वेचे नियम नक्कीच माहिती असायला हवेत.
4 / 10
मिडिल बर्थसंदर्भात रेल्वेचे नियम (Railway rule for Middle berth) काहीसे वेगळे आहेत. खरे तर, रेल्वेचे नियम अत्यंत उपयोगी असतात आणि आपल्याला याची कल्पना असेल, तर आपला प्रवास अत्यंत सुखकर होऊ शकतो. तसेच या नियमांची माहिती नसेल तर आपल्याला प्रवासात अनेक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.
5 / 10
मिडिल बर्थसाठी झोपण्याचा नियम - मिडिल बर्थ असलेले लोक अनेकवेळा ट्रेन सुरू होताच बर्थ वर करतात. यामुळे लोअर बर्थ (Train Lower berth) असलेल्यांना प्रचंड त्रास होतो. मात्र, रेल्वे नियमांप्रमाणे, मिडिल बर्थ असलेला प्रवासी आपल्या बर्थवर केवळ रात्री 10 वाजेल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंतच झोपू शकतो...
6 / 10
...म्हणजेच, रात्री 10 वाजण्याच्या आधी एखादा प्रवासी आपला मीडल बर्थ ओपन करत असेल, तर आपण त्याला रोखू शकता. तसेच, इतर प्रवाशांना लोअर बर्थवर बसता यावे यासाठी मिडलबर्थ सकाळी 6 वाजल्यानंतर खाली करावा लागेल.
7 / 10
अनेक वेळा लोअर बर्थ असलेले प्रवासी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि मिडल बर्थ वाल्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत आपण 10 वाजता आपली सीट वर करू शकता. अथवा ओपन करू शकता.
8 / 10
TTE चेक करणार नाही... - आपल्या प्रवासादरम्यान, ट्रॅव्हल तिकीट एक्झामिनर (TTE) टिकिट चेक करण्यासाठी येतो. कधी-कधी तर तो तुम्हाला झोपेतूनही उठवतो. मात्र, TTE देखील रात्री 10 वाजल्यानंतर तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही.
9 / 10
खरे तर, टीटीईला सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच तिकिट चेकिंगचा अधिकार आहे.
10 / 10
रात्री झोपल्यानंतर कोणत्याही प्रवाशाला त्रास होणार नाही, अशी रेल्वेची मार्गदर्शक सूचना आहे. मात्र, रात्री 10 वाजल्यानंतर प्रवास सुरू करणाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे