Know about Interesting facts about bill gates lifestyle
800 कोटींच्या घरात राहतात बिल गेट्स; तुम्हाला क्वचितच माहीत असतील त्यांच्या बद्दलच्या 'या' खास गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 6:14 PM1 / 8बिल गेट्स यांना कोण ओळखत नाही. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र, एक काळ होता, तेव्हा ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. 2 / 8बिल गेट्स केवळ 32 वर्षांचे असतानाच त्यांचे नाव अब्जाधिशांच्या फोर्ब्स लिस्टमध्ये आले होते. ते 'दानवीर' म्हणूनही ओळखले जातात.3 / 8गेट्स यांनी 2007 मध्ये जगभरातील गरजू लोकांच्या मदतीसाठी जवळपसा 1760 अब्ज रुपये दान केले होते. जाणून घेऊयात गेट्स यांच्या संदर्भातील काही खास गोष्टी, ज्या तुम्हालाही क्वचितच माहीत असतील.4 / 8बिल गेट्स हे एक कॉलेज ड्रॉपआउट होते. जगभरातील काही यशस्वी उद्योजकांप्रमाणेच त्यांनाही आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही.5 / 8गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टसोबतचे आपले स्वप्त पूर्ण करण्यासाठी जगातील प्रसिद्ध हार्वर्ड यूनिव्हर्सिटी सोडली होती. खरे तर जगभरातील विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असतात. 6 / 8बिल गेट्स यांना पुस्तके वाचण्याचा नाद आहे. एका वृत्तानुसार, गेट्स यांनी दावा केला होता, की ते दरवर्षी जवळपास 50 पुस्तके वाचतात. 7 / 8बिल गेट्स केवळ 22 वर्षांचे असताना 1977मध्ये न्यू मॅक्सिकोत वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. ते आपली कार फार वेगात चालवत होते आणि त्यांच्याकडे लायसन्सदेखील नव्हते.8 / 8बिल गेट्स ज्या घरात राहतात, त्या घराची किंमत जवळपास 800 कोटी रुपये एवढी आहे. स्विमिंग पूलसह सर्व सुख-सुविधा असलेल्या या घरात एक मोठी लायब्ररीदेखील आहे. यात लिओनार्डो द विंचीचे एक हस्तलिखीतही आहे. गेट्स यांनी ते 1994 मध्ये एका लिलावात विकत घेतले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications