मस्तच! आता केवळ १०० रुपयांत मिळवा ७५ हजारांचा लाभ; LIC ची सामान्यांसाठी खास भेट By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 4:45 PM
1 / 11 भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच LIC च्या अनेक योजना अगदी सर्वसामान्यांसाठीही विशेष अशाच असतात. शिवाय परताव्याची हमी असल्यामुळे बाजारात अनेक कंपन्या असल्या, तरी शेवटी LIC वर अनेकांचा विश्वास असल्याचे पाहायला मिळते. 2 / 11 अलीकडेच LIC ने पॉलिसी पुनरुज्जीवनाची विशेष योजना राबवली होती. यानुसार, काही कारणास्तव प्रीमियम भरू न शकल्यामुळे बंद झालेल्या पॉलिसीज पुन्हा सुरू करण्याची सुवर्ण संधी LIC ने आणली होती. 3 / 11 गरीब लोकांचे हित लक्षात घेऊन जीवन विमा महामंडळाने आम आदमी विमा योजना सुरू केली. या कार्यक्रमांतर्गत विमाधारकास बरेच फायदे मिळतात. LIC पॉलिसी घेणाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त आणि फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या... (lic aam admi bima yojana policy) 4 / 11 असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आम आदमी बीमा योजना नावाची योजना आणली आहे. आम आदमी विमा योजनेबद्दल बोलायचे झाल्यास ही पॉलिसी LIC द्वारे चालवली जाते. 5 / 11 आम आदमी बीमा योजना केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून चालवली जाते. जीवन विमा संरक्षणातील फायद्यांव्यतिरिक्त, राज्यातील ग्रामीण भूमिहीन कुटुंबाच्या प्रमुखांना आंशिक आणि कायमस्वरूपी अपंगत्व किंवा कुटुंबातील एखाद्या कमावत्या सदस्याला या योजनेंतर्गत लाभ मिळतो. 6 / 11 या विमा योजनेचा लाभ १८ ते ५९ वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. मात्र, यासाठी अर्जदार कुटुंबाचा प्रमुख अशी अट नाही. कुटुंबातील कमाई करणारा सदस्य/दारिद्र्य रेषेखालील/दारिद्र्य रेषेच्या वरचा, जो शहरात राहतो, पण त्याला शहरी भागाची ओळखपत्र मिळत नाही, तो ग्रामीण भूमिहीन असावा, असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 7 / 11 LIC च्या या आम आदमी विमा योजनेसाठी अर्ज करताना आपल्याकडे रेशनकार्ड, जन्म दाखला, शाळेच्या दाखलाचा पुरावा, मतदार ओळखपत्र, सरकारी खात्याने दिलेली ओळखपत्र, आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 8 / 11 या योजनेनुसार, विमा संरक्षण कालावधीत सदस्याचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर त्यावेळेस लागू असलेल्या विमा योजनेत नामनिर्देशित व्यक्तीला ३० हजार रुपये दिले जातील. नोंदणीकृत व्यक्तीचा अपघातामुळे किंवा अपंगत्वामुळे मृत्यू झाल्यास पॉलिसीनुसार नामनिर्देशित व्यक्तीला ७५ हजार रुपये दिले जातील. 9 / 11 शिष्यवृत्ती लाभांतर्गत या विमा योजनेच्या ९ वी ते १२ वी या दरम्यान शिक्षण घेणाऱ्या दोन मुलांना लाभ मिळतो. त्यांना दर मुलाला १०० रुपये दराने शिष्यवृत्ती दिली जाते. ते अर्ध-वार्षिक दिले जातात. अपंगत्व आल्यास पॉलिसीधारक किंवा नामनिर्देशित व्यक्तीला ३७ हजार ५०० रुपये दिले जातील. 10 / 11 LIC च्या या आम आदमी विमा योजनेसाठी ३० हजार रुपयांच्या विम्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे प्रीमियम प्रति वर्ष २०० रुपये घेतले जाते. यामध्ये ५० टक्के सुरक्षा निधी राज्य सरकार वा केंद्रशासित प्रदेश पुरवितो. 11 / 11 अन्य इतर व्यावसायिक गटाच्या बाबतीत, उर्वरित ५० टक्के प्रीमियम नोडल एजन्सी/सदस्य/राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून पुरवले जातात. LIC कडून चालवली जाणारी ही योजना सर्वसामान्यांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरू शकते, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा