know about now ration card holders can order grain at home online just download mera ration app
Ration Card धारकांसाठी गुड न्यूज! आता घरबसल्या मिळणार धान्य; कसं? पाहा, डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 6:59 PM1 / 15Ration Card धारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील कोरोना स्थिती गंभीर झाली असताना महाराष्ट्रात १५ दिवसांसाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. 2 / 15कोरोना नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे बाहेर जाऊन रेशन कसे आणायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे, यावर सरकारने नामी योजना आणली आहे. 3 / 15आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रवासी मजुरांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळावे यासाठी सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड योजना (One Nation One Ration Card Scheme) चालविली जाते. 4 / 15लाभार्थ्यांना शिधा केंद्रातून धान्य मिळते. गर्दी आणि लांब रांगा असल्याने अनेकदा रेशन मिळण्यास अडचण येते. या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने मेरा रेशन अॅप (Mera Ration App) सुरू केले असून, याद्वारे आता आपण घरी बसून धान्य मिळवू शकता.5 / 15Mera Ration App वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा भाग असून, या माध्यमातून घरी बसून रेशन बुक करू शकता. यासंदर्भात केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी माहिती दिली आहे. 6 / 15एनएफएसएचे लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, वाजवी किमतीचे दुकान किंवा रेशन शॉप विक्रेता यांच्यामध्ये ओएनओआरसी संबंधित सेवा सुलभ करणे या मोबाईल अॅपचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती सुधांशू पांडे यांनी दिली आहे. 7 / 15Mera Ration App वापरणे सुलभ आणि सोपे आहे. गुगल प्लेस्टोरवर हे अॅप मोफत उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड करून इंस्टालेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर अॅप उघडा आणि त्यात आपल्या रेशनकार्डचा तपशील भरा. 8 / 15ही प्रक्रिया झाल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल. यानंतर आपण अॅपवरून घरबसल्या रेशन मागवू शकता. मेरा रेशन अॅप (Mera Ration App) सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच १४ भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 9 / 15नागरिकांची सोय लक्षात घेऊन त्यामध्ये प्रमुख प्रादेशिक भाषा जोडल्या जाणार आहेत. या अॅपद्वारे तुम्हाला तुमच्या नजीकच्या Ration सेंटरची अचूक माहिती मिळू शकेल.10 / 15Ration Card धारकांना या अॅपद्वारे रेशन विक्रेत्याची संपूर्ण माहिती आपण पाहू शकता. रेशन कार्डधारक या अॅपद्वारे आपल्या सूचना किंवा तक्रारी नोंदवू शकतात.11 / 15रेशन कधी आणि कसे प्राप्त होईल, ते Ration Card धारक या अॅपच्या मदतीने इतर माहिती स्वतः घेऊ शकतील. या अॅपचा सर्वाधिक स्थलांतरितांना फायदा होईल, असे सांगितले जात आहे. 12 / 15Ration Card धारकांना या अॅपद्वारे नुकत्याच झालेल्या व्यवहारांची माहिती पाहता येईल. तसेच महिन्याभरात त्यांना किती रेशन मिळेल, याची माहितीही यावर उपलब्ध असेल. 13 / 15रेशन कार्ड (Ration Card) हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते.14 / 15Ration Card हे फक्त एका विशिष्ट उत्पन्नाच्या गटासाठी आहे, ज्याचे प्रमाण राज्यात वेगवेगळे आहे. फक्त स्वस्त किंमतीत धान्य मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.15 / 15कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील Ration Card मध्ये नोंदविला जाणे आवश्यक असते. एखादा नवीन सदस्य आपल्या घरात आला असेल, म्हणजेच एखादे बाळ किंवा नवीन सून किंवा अन्य सदस्य, तर आपण त्यांचे नाव रेशन कार्डमध्ये घरबसल्या जोडू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications