मस्तच! आता घरबसल्या सेट करा ATM कार्डचा नवीन पिन; ‘या’ बँकेची विशेष सुविधा By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 3:03 PM
1 / 15 देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. 2 / 15 अशातच बँकिंग व्यवहार करणे काही जणांसाठी कठीण होत चालले आहे. कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर सुलभ व्यवहारासाठी डेबिट कार्डचा वापर करतो. आपला नवीन डेबिट कार्ड पिन जनरेट करण्यासाठी एटीएम किंवा बँकेच्या शाखेत जावे लागते. 3 / 15 परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना बँक शाखेत न जाता लगेचच डेबिट कार्डचा पिन जनरेट करण्याची सुविधा देत आहे. (set up a new ATM card PIN) 4 / 15 या पिनला ग्रीन पिन म्हणतात. डेबिट कार्ड पिन जनरेट करण्याची ही पद्धत सर्वात सोपी आहे. हे आयव्हीआर, इंटरनेट बँकिंगद्वारे केले जाऊ शकते. म्हणजेच आता घरबसल्या डेबिट कार्डचा नवीन पिन सेट करता येऊ शकेल. 5 / 15 प्रथम आपल्याला www.onlinesbi.com वर जावे लागेल. आपण तेथे लॉग इन करून युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. यानंतर दर्शविलेल्या पर्यायांमधून ‘ई-सेवा’ टॅब अंतर्गत ‘एटीएम कार्ड सेवा’ निवडा. 6 / 15 एटीएम पिन जनरेशन असा पर्याय निवडा. आपण दोन पर्यायांद्वारे आपला एटीएम पिन जनरेट करू शकता. यामध्ये ओटीपी किंवा प्रोफाईल पासवर्ड वापरणे सादर करावा लागतो. (set up a new ATM card PIN at home) 7 / 15 आपण ओटीपीच्या पर्यायासह पुढे गेल्यास आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. यानंतर डेबिट कार्ड ज्या बचत खात्याशी जोडले गेले आहे, त्याची माहिती द्यावी लागेल. 8 / 15 ज्या एटीएम कार्डसाठी पिन जनरेट केले जाईल तो निवडा. नंतर सबमिटवर क्लिक करा. आपण तयार करू इच्छित असलेल्या नवीन पिनचे प्रथम दोन अंक प्रविष्ट करा. उर्वरित दोन अंक एसएमएसद्वारे आपल्याला पाठविले जातील. 9 / 15 मोबाईल नंबरवर मेसेजद्वारे मिळालेले पहिले दोन अंक व आधीचे दोन अंक एकत्रित टाकून सबमिटवर क्लिक करा. अशा प्रकारे आपला पिन इंटरनेट बँकिंगद्वारे जनरेट केला जाईल. 10 / 15 आयव्हीआर प्रणालीद्वारे एसबीआय डेबिट कार्ड ग्रीन पिन तयार करण्यासाठी, आपल्याला नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून आपल्याला टोल फ्री नंबर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करावा लागेल. 11 / 15 कॉल करण्यापूर्वी आपले एटीएम कार्ड आणि खाते क्रमांक एकत्र ठेवा जेणेकरुन आवश्यक असल्यास सर्व माहिती त्वरित प्रविष्ट करता येईल. कॉलनंतर एटीएम / डेबिट कार्ड संबंधित सेवांसाठी दुसरा पर्याय निवडा. 12 / 15 पिन जनरेशनसाठी पहिला पर्याय निवडावा. ग्राहक प्रतिनिधीशी बोलायचे असल्यास दुसरा पर्याय निवडवा. आयव्हीआर तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डच्या शेवटच्या पाच क्रमांकाची नोंद करण्यास सांगेल. 13 / 15 आपल्या खाते क्रमांकाचे शेवटचे पाच अंक प्रविष्ट करा. जर आपण सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट केली असेल तर पुढील चरणात आपल्याला आपली जन्मतारीख सांगावी लागेल. 14 / 15 आपला ग्रीन पिन जनरेट केला जाईल आणि आपल्या मोबाईल नंबरवर मॅसेज मिळेल. पिन बदलण्यासाठी आपल्याला जवळच्या कोणत्याही एटीएमवर २४ तासांत आत जावे लागेल. 15 / 15 अशी प्रक्रिया पूर्ण करून आपण घरबसल्या डेबिट कार्डचा एटीएम पिन सेट करू शकाल. याचा मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना फायदा होऊ शकेल, असे सांगितले जाते. आणखी वाचा