SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती? By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 7:37 PM
1 / 15 सन २०२० मध्ये कोरोनामुळे जगभरात हाहाःकार माजला. भारतात आताच्या घडीला कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करून शास्त्रज्ञांनी लसीचा शोध लावला. 2 / 15 कोरोनाची लस प्रत्यक्ष औषध नसली, तरी कोरोनाविरोधातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हर्ड इम्युनिटी तयार करण्यासाठी याचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. 3 / 15 भारतात जानेवारी महिन्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या कोव्हिशिल्ड (covishield) लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली. मात्र, त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ही कंपनी जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी ठरली. 4 / 15 जगभरातील अनेक देशांना सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसींची निर्यात करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती आहे? या कंपनीचा निव्वळ नफा किती आहे? जाणून घेऊया... (income of serum institute of india) 5 / 15 कॉर्परेट कंपन्याच्या व्यवहारासंदर्भात माहिती ठेवणाऱ्या कॅपिटलाइनने प्रकाशित केलेल्या नव्या अहवालानुसार सन २०१९-२० मध्ये भारतातील ४१८ भारतीय कंपन्यांनी पाच हजार कोटींहून अधिक रक्कमेचा एकूण व्यापार केला आहे. 6 / 15 यामध्येही सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचा सामावेश आहे. 7 / 15 सीरमने ५ हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात दोन हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. हा नफा नेट मार्जिनच्या ४१.३ टक्के इतका आहे. सीरम इन्स्टिट्यूट ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी नसल्यामुळे योग्य माहिती मिळू शकत नाही, असे सांगितले जात आहे. 8 / 15 पाच हजार कोटींचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये १८ कंपन्या या औषध क्षेत्राशी संबंधित आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मॅकलेओड्स फार्मास्युटीकल्सचा समावेश आहे. या कंपनीने २८ टक्के नफा कमावला आहे. 9 / 15 सीरम कंपनीच्या नफ्याची टक्केवारी अधिक असण्यामागील मुख्य कारणांपैकी एक कारण म्हणज कंपनी भारतामध्ये लसीची निर्मिती करत असून, जगामध्ये सध्या सर्वाधिक लसीची गरज भारतालाच आहे. त्यामुळेच जगातील सर्वांत मोठी औषध निर्मिती करणारी सीरम ही सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे. 10 / 15 सीरमची मालकी असणाऱ्या पुनावाला समुहाने हॉर्स ब्रीडींग, बांधकाम व्यवसाय, अर्थसहाय्य, हवाई श्रेत्र यामध्येही गुंतवणूक केली आहे.गेल्या काही वर्षांत सीरमचा महसूल २३ टक्कांनी वाढून वार्षिक स्तरावर ४ हजार ६३० कोटींवर पोहचला. तर निव्वळ नफ्यात २८ टक्के वाढ होत तो १२ हजार १९१ कोटींवर पोहचला. 11 / 15 मात्र सन २०१५-१६ ते २०१९-२० दरम्यान कंपनीच्या महसुलामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आणि निव्वळ नफाही या वर्षांमध्ये कायम राहिला. १९६६ मध्ये डॉ. पूनावाला यांनी सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली होती. 12 / 15 सन १९७४ मध्ये सीरमने लहान मुलांच्या काही आजारांवर लस निर्मिती करण्यास सुरुवात केली. सन १९९४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) एक्रेडेशन देण्यात आले. आताच्या घडीला सीरमकडून अनेक प्रकारच्या लसींची निर्मिती करण्यात येते. 13 / 15 जगभरातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनानंतर सीरम इन्स्टिट्यूटने भारतात कोरोनावर प्रभावशाली ठरत असलेल्या कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करण्यास सुरुवात केली. 14 / 15 आताच्या घडीला जागतिक स्तरावरील १०० पेक्षा अधिक देशांना सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसींची निर्यात केली जाते. दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोरोनाविरोधातील लढाईत अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. 15 / 15 सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोवोव्हॉक्स या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्युट कोवोव्हॅक्सच्या (Covovax) तिसऱ्या टप्प्याची चाचणी ही आयसीएमआरसोबत मिळून घेणार आहे. सीरम इन्स्टिट्युटने कोरोनापासून बचावासाठी कोवोव्हॅक्स लस विकसित करण्यासाठी अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्ससोबत करार केलेला आहे. आणखी वाचा