know about simple process how to link up to 5 profiles in mAadhaar app
भन्नाट! एकाच मोबाइलमध्ये आता ५ जणांचे आधारकार्ड ठेवता येणार; 'अशी' करा संपूर्ण प्रोसेस By देवेश फडके | Published: February 17, 2021 12:40 PM1 / 10आताच्या घडीला सर्वांत महत्त्वाचे कागपत्र आधाकार्ड आहे. बँकिंग व्यवहार असो किंवा मोबाइल सीम खरेदी बहुतांश व्यवहारांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे, देशवासीयांच्या सोयीसाठी आता सरकारने mAadhaar अॅपची सुविधा दिली आहे. (now you can add up to 5 profiles in mAadhaar app)2 / 10mAadhaar अॅप डाऊनलोड केल्यानंतर कागदी ‘आधार कार्ड’ वापरण्याची किंवा सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही, असे सांगितले जात आहे. UIDAI ने यासंबंधी ग्राहकांसाठी विशेष सुविधा आणली आहे. 3 / 10विशेष म्हणजे या अॅपमध्ये एकाच वेळी पाच प्रोफाइल जोडता येऊ शकतात. UIDAI ने याविषयी एक ट्वीट करून माहिती दिली आहे. mAadhaar मध्ये यापूर्वी केवळ तीन प्रोफाईल जोडण्याची सुविधा होती.4 / 10ग्राहकांच्या सोयीसाठी UIDAI कडून यामध्ये बदल करण्यात आला आहे. या अॅपमध्ये वेगवेगळ्या १२ भाषांची सुविधा देण्यात आली आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू भाषेतही सुविधा उपलब्ध आहेत.5 / 10गुगल प्ले स्टोअरवर mAadhar अॅप उपलब्ध आहे. मात्र, यासाठी एक महत्त्वाचा निकष लावण्यात आला आहे. तो म्हणजे सर्व पाचही आधार कार्डमध्ये मोबाइल फोनमध्ये वापरण्यात येणारा नंबर सादर करणे आवश्यक आहे. 6 / 10एकाचवेळी ५ आधारकार्ड प्रोफाइल जोडायची सोय असली, तरी एका वेळी एकच आधार प्रोफाइल वापरता येणार आहे, ही बाब वापरकर्त्याने लक्षात ठेवावी, असे सांगितले जात आहे. याची प्रोसेस सोपी आहे. पाहूया...7 / 10सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून mAadhar अॅप डाऊनलोड करावे. आधारकार्ड क्रमांक सादर करावा. यानंतर विचारलेली माहिती भरून व्हेरिफाय करून घ्यावी. यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो सादर करावा.8 / 10ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली की, तुमचे आधारकार्ड दिसू शकेल. मात्र, एखादे प्रोफाइल नको असेल, तर डिलीट करण्यासाठी पुढील प्रोसेस करावी. mAadhar अॅपवर प्रोफाइल उघडा आणि वरच्या उजव्या मेनूवर क्लिक करा. 9 / 10डिलीट प्रोफाईल पर्याय निवडा. यानंतर तुमचे प्रोफाइल अॅपमधून डिलीट होईल. आधारकार्डशी संबंधित जवळपास ३५ योजना आहेत, ज्या स्मार्टफोनच्या मदतीने सहज प्राप्त करता येऊ शकतात.10 / 10mAadhar या App द्वारे तुम्ही आधार कॉपी डाऊनलोड करणे, री-प्रिंटसाठी ऑर्डर करणे, ऑफलाईन ई केवायसी डाऊनलोड, क्यूआर कोड दाखवणे किंवा स्कॅन करणे, आधारचे व्हेरिफिकेशन, मेल किंवा ईमेलचे व्हेरिफिकेशन, यूआयडी किंवा ईआयडी मिळवणे आणि एड्रेस व्हॅलिडेशन लेटरसाठी रिक्वेस्ट पाठवण्यासारख्या अनेक कामांचा त्यात समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications