शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sukanya Samriddhi Yojana : घरी कन्यारत्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी! सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांत पाच मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 9:52 PM

1 / 9
Sukanya Samriddhi Yojana : सरकारी स्मॉल सेव्हिंग स्कीम (Small Saving Scheme) कॅटेगरीमध्ये सुकन्या समृद्धी योजना एक प्रसिद्ध बचत योजना आहे. जर तुमची मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, तर तुम्ही तिच्या नावे हे अकाऊंट सुरू करू शकता.
2 / 9
केंद्र सरकारनं या योजनेशी निगडीत ५ नियमांमध्ये बदल केले आहेत. यानंतर या योजनेत गुंतवणूक करणं अधिक सोपं झालंय. पाहूया या यामध्ये सरकारनं कोणते बदल केले आहेत.
3 / 9
सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षाला कमीतकमी २५० रुपये आणि जास्तीतजास्त १.५ लाख रुपये गुंतवण्याची तरतूद आहे. यापूर्वी किमान रक्कम न गुंतवल्यास खातं डिफॉल्ट केलं जात होतं. परंतु आता असं होणार नाही. आता अकाऊंट पुन्हा अॅक्टिव्ह न केल्यास मॅच्युअर होईस्तोवर खात्यातील जमा रकमेवर व्याज मिळत राहणार आहे.
4 / 9
या योजनेमध्ये यापूर्वी दोन मुलींच्या खात्यावर ८० सी अंतर्गत करात सूट देण्याची तरतूद होती. परंतु तिसऱ्या मुलीसाठी हा फायदा मिळत नव्हता. परंतु पहिल्या मुलीनंतर जुळ्या मुली झाल्या तर खातं उघडण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसंच करातही सूट मिळणार आहे.
5 / 9
पूर्वीच्या नियमानुसार मुलीचं वय १० वर्षांपेक्षा अधिक झाल्यानंतर तिला खातं ऑपरेट करण्याची परवानगी होती. परंतु आता तिचं वय १८ वर्षे झाल्यानंतरच तिला ते खातं चालवता येणार आहे. तोपर्यंत तिचे पाल्य ते खातं चालवू शकतात.
6 / 9
यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत असलेलं खातं मुलीचं निधन झाल्यास किंवा तिचा पत्ता बदलल्यानंतर बंद केलं जाऊ शकत होतं. परंतु आता खातेधारकाला गंभीर आजार झाल्यासही ते बंद केलं जाऊ शकतं.
7 / 9
नव्या नियमानुसार खात्यात चुकून व्याज आल्यास ते पुन्हा घेण्याची तरतूदही हटवण्यात आली आहे. याशिवाय खात्यावरील व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरिस खात्यात जमा केलं जाईल.
8 / 9
केंद्र सरकारनं २०१५ मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात केली होती. या योजनेंतर्गंत खात्यातील जमा रकमेवर वर्षाला ७.६ टक्के व्याज दिलं जातं. कोणालाही आपल्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हे खातं उघडता येईल.
9 / 9
केंद्र सरकारनं २०१५ मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरूवात केली होती. या योजनेंतर्गंत खात्यातील जमा रकमेवर वर्षाला ७.६ टक्के व्याज दिलं जातं. कोणालाही आपल्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हे खातं उघडता येईल.
टॅग्स :GovernmentसरकारInvestmentगुंतवणूकPost Officeपोस्ट ऑफिसbankबँक