know about these 5 things must keep in mind when buying health insurance policy
तुम्ही Health Insurance काढताय? 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा, धोका टाळा By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 4:38 PM1 / 12आधुनिक जगात वाढलेल्या रोग संसर्गामुळे Health Insurance काढण्यावर अगदी सर्वसामान्य व्यक्तींचा भर असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांत कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. 2 / 12यातच भर म्हणून कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा प्रादुर्भाव आजच्या घडीलाही पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांनी कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन याचा समावेश Health Insurance मध्ये केला आहे. 3 / 12विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी, Health Insurance ची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. आरोग्याचा खर्च वेगाने वाढत पाहायला मिळत आहे. कोणताही गंभीर आजार एखाद्या व्यक्तीस आर्थिक संकटात ढकलण्यासाठी पुरेशी असतो. हे टाळण्यासाठी आरोग्य विमा आवश्यक आहे.4 / 12Health Insurance साठी बाजारात बर्याच वेगवेगळ्या कंपन्या असून, ते अनेकविध प्रकारच्या आरोग्य विमा पॉलिसी देत आहेत. परंतु, आरोग्य विमा घेताना ग्राहकाने काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, असे सांगितले जाते. नेमके कोणत्या गोष्टींचे भान ठेवायला हवे? जाणून घेऊया... (these 5 things must keep in mind when buying health insurance policy)5 / 12Health Insurance पॉलिसीमध्ये गंभीर आजारासाठी क्लेमची रक्कम जास्त आहे की नाही, ते पाहावे. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक विमा कंपन्यांच्या धोरणांमध्ये, काही गंभीर आजारांवरील क्लेमची रक्कम तुलनेने कमी असते.6 / 12Health Insurance पॉलिसी घेण्यापूर्वी ग्राहकाने याबाबतची माहिती करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय पॉलिसी घेताना गंभीर आजाराच्या कव्हर यादीसह सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत, असे सांगितले जाते. 7 / 12आजारी पडल्यानंतर रुग्णालयात भरतीसाठी लागणाऱ्या संपूर्ण Health Insurance पॉलिसीची निवड करणे ग्राहकांसाठी चांगले असते. बाजारातील अनेक विमा कंपन्यांच्या पॉलिसींमध्ये पॉलिसीधारकास एका मर्यादेनंतर वॉर्ड किंवा आयसीयूचे बिल स्वत:लाच भरावे लागते. पॉलिसी घेण्यापूर्वी ग्राहकाने याची माहिती अवश्य करून घ्यावी, असे सल्ला दिला जातो. 8 / 12Health Insurance विमा पॉलिसींमध्ये जास्तीत जास्त पॉलिसीच्या मुदतीत एकरकमी प्रीमियम भरण्यापासून सूट दिली जाते. पॉलिसीची मुदत जास्तीत जास्त तीन वर्षे असू शकते. प्रीमियम एकत्र जमा करुन ग्राहक या सूटचा लाभ घेऊ शकतात.9 / 12Health Insurance पॉलिसी घेताना नेमक्या कोणकोणत्या आजारासाठी विमा कवच आहे, याची खात्री करून घ्यावी. आधुनिक जगातील आजारांचा त्यात समावेश असण्याबाबत निश्चिती करावी. याचे कारण काही कंपन्या त्यांच्या पॉलिसीमध्ये विमाधारकाचा तत्कालीन आजारासाठी कवर देतात आणि काही देत नाहीत.10 / 12Health Insurance पॉलिसीमध्ये ग्राहकांना सध्याच्या आजारासाठी कव्हर असेल आणि प्रतीक्षा कालावधी कमी असेल, अशा आरोग्य विम्याची निवड करावी, असे सांगितले जाते. 11 / 12Health Insurance पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाने विमाधारक सेवांसाठी जे स्वतः पैसे द्यावे लागतात. ही रक्कम आधीच ठरलेले असते. याला को-पेमेंट म्हटले जाते. बहुतेक विमा पॉलिसी को-पेमेंटच्या अटीसहच असतात.12 / 12Health Insurance घेताना कमीत कमी को-पेमेंट द्यावे लागेल, अशाच पॉलिसीची निवड ग्राहकाने करावी. याशिवाय ग्राहक को-पेमेंटची अट काढून टाकण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. मात्र, यासाठी ग्राहकाला जादा प्रीमियम भरावा लागतो. आणखी वाचा Subscribe to Notifications