शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vi च्या ‘या’ प्लानमध्ये बदल; केवळ ७ रुपयांत दररोज १.५ जीबी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 6:55 PM

1 / 10
टेलिकॉम क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे अनेक कंपन्या नवनवीन प्लान सादर करत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किमतीत अधिक सुविधा देणारे प्लान्स कंपन्यांकडून ऑफर केले जात आहेत.
2 / 10
जिओच्या टेलिकॉम क्षेत्रातील प्रवेशानंतर व्होडाफोन आणि आयडिया कंपन्यांनी एकत्रितपणे Vi कंपनी सुरू केली. आता Vi ने आपल्या प्लानमध्ये बदल केले आहेत.
3 / 10
Vodafone Idea ने २५९५ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला असून, या प्लानमध्ये आधी रोज २ जीबी डेटा मिळत होता. आता यात कमी करून रोज १.५ जीबी डेटा देण्यात येणार आहे.
4 / 10
Vi च्या २,५९५ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसोबत रोज १.५ जीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानमध्ये आता Dinsey+ Hotstar स्ट्रीमिंग बेनिफिट्स दिले जात आहे. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि SMS ऑफर केले जात आहेत.
5 / 10
Vi च्या दुसऱ्या एका २,३९९ रुपयांचा वार्षिक प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि SMS मिळतात. तसेच Zee5 Premium चे सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे.
6 / 10
Vi च्या तिसऱ्या एका १,४९९ रुपयांच्या वार्षिक प्लानमध्ये युजर्संना २४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये रोजच्या डेटासोबत Disney+ Hotstar चे स्ट्रीमिंग बेनिफिट्स ऑफर केले जात आहेत.
7 / 10
Vi सह स्पर्धक असलेल्या जिओकडून २,५९९ चा प्लान ऑफर केला जातो. यामध्ये युझर्संना दररोज २ जीबी डेटा दिला जातो. तसेच या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. यात Disney+ Hotstar चे एक वर्षासाठी व्हीआयपी सब्सक्रिप्शन देण्यात येते.
8 / 10
तसेच या सेगमेंटमध्ये Airtel चा २,६९८ रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लान आहे. युजर्संना यात रोज २ जीबी डेटा दिला जातो.
9 / 10
याशिवाय, या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० SMS मिळतात. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लानमध्ये Disney+ Hotstar चे एक वर्षाचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळते.
10 / 10
कमी किमतीत अनेकविध प्लान उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होतो, असे सांगितले जाते. तसेच कंपनी ग्राहक टिकवण्यासाठी अतिरिक्त ऑफर देतात, असेही म्हटले जाते.
टॅग्स :MobileमोबाइलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेलJioजिओ