शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ratan Tata: विद्वान आणि सज्जन माणूस! रतन टाटांचे टेस्ला प्रमुख एलन मस्कनी केले कौतुक; कारण काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 4:26 PM

1 / 12
TATA ग्रुप आताच्या घडीला विविध क्षेत्रात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे, तर Air India ची मालकी परत मिळवण्यातही TATA ग्रुपला यश मिळाले आहे. TATA ग्रुपचे प्रमुख असलेल्या रतन टाटा (Ratan Tata) यांनी याबद्दल आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या.
2 / 12
जागतिक स्तरावर सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आघाडीवर असलेल्या एलन मस्क यांनी (Elon Musk) यांनी रतन टाटा यांचे कौतुक केले आहे. तसे पाहिल्यास रतन टाटा यांचे अनेक किस्से सर्वश्रुत आहेत. त्यांचा साधेपणा, मदत करण्याची दानशूर वृत्ती आणि कर्मचाऱ्यांप्रती असलेली आपलेपणाची भावना सर्वांनाच माहिती आहे.
3 / 12
जगातील अनेक उद्योजक, दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतात. टेस्ला (Tesla) आणि स्पेस एक्स (Space X) चे प्रमुख एलन मस्क यांनीही रतन टाटा यांचे कौतुक केले आहे. रतन टाटा विद्वान आणि सज्जन असल्याचे एलन मस्क यांनी म्हटले आहे.
4 / 12
झाले असे की, एका मुलाखतीत एलन मस्क यांना रतन टाटा यांच्या महत्त्वाकांक्षी नॅनो कारबाबत विचारले होते. त्यावेळी यासंदर्भात बोलताना एलन मस्क म्हणाले होते की, रतन टाटा यांना मी ओळखतो. भारतीय बाजारात स्वस्त कार सादर करण्याचा विचार चांगला आहे.
5 / 12
वास्तविक रतन टाटा यांची संकल्पना मला मनापासून आवडलेली नाही आणि पटलेलीही नाही. मात्र, त्याबाबत मी काही भाष्य करणार नाही. कारण रतन टाटा सज्जन आणि विद्वान आहेत. रतन टाटांचा विचार चांगला आहे. भविष्य अधिक आव्हानात्मक असणार आहे, असे एलन मस्कने म्हटले होते.
6 / 12
रतन टाटा यांचा महत्त्वाकांक्षी नॅनो कार प्रकल्प २०१९ मध्ये बंद करण्यात आला. नॅनो कारमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे कारला आग लागण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे लोकप्रिय कार आणि टाटा कंपनीबाबत जनतेचा विश्वास कमी होत चालला होता. यामुळे अखेर हा प्रकल्प बंद करण्यात आला.
7 / 12
दरम्यान, अलीकडेच TATA ग्रुपमधील टाटा मोटर्स कंपनीने टेस्लाच्या एलन मस्क यांनी केलेल्या एका मागणीला जोरदार विरोध दर्शवला असून, मोदी सरकारच्या योजनेला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
8 / 12
Tesla चे सीईओ एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच भारतात जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वांत जास्त आयात शुल्क आकारले जाते असे म्हटले होते. तसेच आम्हाला आयात शुल्कामध्ये किमान तात्पुरती सवलत तरी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.
9 / 12
एलन मस्क यांनी केलेल्या याच मागणीला TATA मोटर्सने विरोध दर्शवला आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर युनिटचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे की, एलन मस्क यांची मागणी केंद्र सरकारच्या FAME म्हणजेच फास्टर एडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाइब्रिड आणि इलेक्ट्रिक व्‍हेईकल पॉलिसीच्या विपरीत आहे.
10 / 12
या पॉलिसीच्या माध्यमातून भारताला इलेक्ट्रिक वाहन उत्पादनचे केंद्र बनवण्याचे केंद्रातील मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आयात शुल्क कमी करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यावर भर द्यायला हवा.
11 / 12
एलन मस्क यांच्या मागणीमुळे केंद्र सरकारच्या फेम प्रोग्रामचा उद्देश पूर्ण होणार नाही, असेही चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. आताच्या घडीला इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात TATA मोटर्सचा वाटा ९० टक्के आहे.
12 / 12
एलन मस्क यांच्या मागणीमुळे केंद्र सरकारच्या फेम प्रोग्रामचा उद्देश पूर्ण होणार नाही, असेही चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. आताच्या घडीला इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात TATA मोटर्सचा वाटा ९० टक्के आहे.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटाTeslaटेस्ला