know everything about how to open an account for ipo investment check details and process
तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायचीय? ‘असे’ उघडा खाते; पाहा, सोपी प्रक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 1:02 PM1 / 10आताच्या घडीला शेअर मार्केट तेजीत असून, अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO सादर केले जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये SEBI ने २८ हजार कोटींहून अधिक किमतीच्या नवीन आयपीओंना मान्यता दिली आहे. 2 / 10कोरोना संकटाच्या काळातही अनेक कंपन्या दमदार कामगिरी करत असून, उत्तम परतावा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल होताना दिसत आहेत. यामुळे गुंतवणूकही वाढताना पाहायला मिळत आहे. 3 / 10तुम्हालाही IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला आधी डीमॅट खाते उघडावे लागेल. याशिवाय तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकणार नाही. डीमॅट खात्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते शून्य खाते शिल्लक असतानाही उघडले जाऊ शकते. 4 / 10डीमॅट खात्यात किमान शिल्लक राखण्याची गरज नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे बँक खाते, ट्रेडिंग खाते आणि डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. कारण डीमॅट खात्यात तुम्ही डिजिटल पद्धतीने शेअर्स ठेवू शकता.5 / 10ट्रेडिंग अकाऊंटच्या मदतीने आयपीओ, शेअर्स, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. तुम्ही सीडीएसएल किंवा एनएसडीएलमध्ये नोंदणीकृत कोणत्याही डिपॉझिटरी ब्रोकरकडे डीमॅट खाते उघडू शकता, असे सांगितले जाते. 6 / 10ज्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे, अशी कोणतीही व्यक्ती डीमॅट खाते डिजिटल पद्धतीने उघडू शकते. यासाठी पॅन, बँक खाते, ओळख आणि पत्त्याचा पुरावा अनिवार्य कागदपत्रे आहेत. तर, शेअर्सची गुंतवणूक आणि ट्रेडिंग खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाते. 7 / 10डिजिटल पद्धतीने डीमॅट खाते उघडण्यासाठी प्रथम ब्रोकरच्या वेबसाईटवर जा. त्यानंतर खाते उघडण्याचा फॉर्म भरा. यामध्ये तुम्हाला नाव, पत्ता, पॅन आणि डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याशी लिंक केलेले बँक खाते यांचे तपशील भरावे लागतील.8 / 10ज्या फर्ममधून तुम्ही डीमॅट खाते उघडत आहात, तुमच्या सेवा प्रदात्याच्या कार्यालयात तुम्हाला कॉल करा, अशा पद्धतीने डीमॅट खाते उघडून IPO मध्ये गुंतवणूक करता येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, Paytm देशातील सर्वात मोठा IPO आणणार आहे. याद्वारे १८ हजार ३०० कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. 9 / 10येत्या काही दिवसांमध्ये अर्धा डझनहून अधिक कंपन्यांचे IPO येताहेत. या कंपन्यांनी जुलै ते ऑगस्ट २०२१ दरम्यान सेबीकडे IPO साठी कागदपत्रे सादर केली होती.10 / 10पॉलिसीबाझार आणि पेटीएम, न्याका यांसह अर्धा डझनांहून अधिक कंपन्यांचे IPO येत आहेत. अनेक गुंतवणूकदार पॉलिसीबाझार आणि पेटीएम यांसारख्या आयपीओच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications