शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाईल क्रमांकाशिवाय 'असं' करा तुमचं Aadhar Card डाऊनलोड; पाहा संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 4:45 PM

1 / 6
आधार कार्ड हे आजच्या काळात अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत जर तुमचे आधार कार्ड हरवले तर तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तर आपण जाणून घेऊया मोबाईल क्रमांकाशिवाय तुम्हाला तुमचं आधार कार्ड कसं डाऊनलोड करता येईल.
2 / 6
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधारच्या Uidai.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या होम पेजवर असलेला माय आधार हा पर्याय निवडा. या पेजवर तुम्हाला वरील बाजूला एक ड्रॉपडाऊन मेन्यू दिसेल.
3 / 6
ज्यावेळी तुम्ही माय आधारवर जाल तेव्हा त्या ठिकाणी Order Aadhaar Reprint या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचा १२ अंकी आधार कार्ड क्रमांक किंवा १६ अंकी व्हर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर त्या ठिकाणी एन्टर करा. त्यानंतर तुम्हाला विचारलेला सिक्युरिटी कोड त्यात टाका.
4 / 6
मोबाईल क्रमांकाशिवाय आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला My Aadhaar Card is not Registered या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दुसरा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी एन्टर करावा लागेल. यानंतर तुम्हाला Send OTP या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
5 / 6
यानंतर नियम आणि अटींच्या चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करा. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्ही एका नव्या पेजवर जाल. रिप्रिन्टपूर्वी तुम्हाला 'Preview Aadhaar Letter चा स्क्रिन दिसेल. यानंतर तुम्ही तुमची माहिती तपासून पाहा. त्यानंतर तुम्हाला शुल्क भरण्यावर क्लिक करावं लागेल. तसंच नंतर तुम्हाला पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी करावी लागेल.
6 / 6
त्यानंतर तुम्हाला एसएमएस सेवेच्या माध्यमातून एक सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल. आधार पाठवण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती या नंबरच्या माध्यमातून पाहता येईल. अर्ज ट्रॅक करण्यासाठी सर्व्हिस रिक्वेस्ट नंबरचा वापर करावा लागेल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल