शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 8:54 AM

1 / 6
Savitri Jindal Haryana Election Networth : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपनं देशातील सर्वात श्रीमंत महिलेला तिकीट नाकारलं. मात्र, त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुकीत बाजीही मारली. सावित्री जिंदाल असं देशातील सर्वात श्रीमंत महिलेचं नाव आहे. हिसारमधून अपक्ष उमेदवार म्हणून सावित्री जिंदाल यांनी निवडणूक लढवली आणि त्या विजयीदेखील झाल्या आहेत.
2 / 6
७४ वर्षीय सावित्री जिंदाल यांनी निवडणूक लढवणं आणि जिंकणं हे अनेक अर्थांनी खास आहे. पहिली गोष्ट म्हणजे सावित्री जिंदाल या देशातील प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या आई आहेत. नवीन जिंदाल हे आधी काँग्रेसमध्ये होते, पण नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत.
3 / 6
विधानसभा निवडणुकीत सावित्री जिंदाल यांना भाजपकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. दुसरी खास गोष्ट त्यांना खूप खास बनवते.
4 / 6
सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ ३४.४ अब्ज डॉलर (सुमारे २.८८ लाख कोटी रुपये) आहे. त्यांच्या संपत्तीत यंदा ९.६८ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
5 / 6
देशातील टॉप ५ श्रीमंतांमध्ये सावित्री जिंदाल पाचव्या क्रमांकावर आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी, दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी, तिसऱ्या क्रमांकावर शिव नाडर आणि चौथ्या क्रमांकावर शापूर मिस्त्री आहेत. त्यानंतर सावित्री जिंदाल पाचव्या क्रमांकावर आहे. दिलीप सांघवी, अझीम प्रेमजी यांसारखे उद्योगपती सावित्री जिंदाल यांच्यापेक्षा खूप मागे आहेत.
6 / 6
केवळ देशच नव्हे तर सावित्री जिंदाल यांचं नाव जगातील श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट आहे. सावित्री जिंदाल जगातील पहिल्या ६० श्रीमंत व्यक्तींमध्ये आहेत. या यादीत त्यांचं नाव ५३ व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच सावित्री जिंदाल जगातील ५३ व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर जगातील सर्वात श्रीमंत महिलांबद्दल बोलायचे झाले तर सावित्री जिंदाल ६ व्या स्थानावर आहेत.
टॅग्स :Savitri Jindalसावित्री जिंदालharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Haryanaहरयाणा