know these 10 key factors of lic ipo to open on 4 may 2022 and price band may set at 902 949 rs
LIC चा IPO घेताय? गुंतवणूकदारांनो ‘या’ १० महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा; पाहा, डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 8:45 PM1 / 12बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) समभाग विक्री योजनेला (IPO) अखेर मुहूर्त मिळाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एलआयसीचा आयपीओ खुला होणार आहे. 2 / 12सरकारने सेबीकडे IPO चा संशोधित ड्राफ्ट जमा केला आहे. संशोधित ड्राफ्टमध्ये सरकारने LIC चे व्हॅल्युएशन कमी करण्यात आले आहे. तसेच आयपीओची साइझसुद्धा घटवली आहे. 3 / 12LIC चा IPO ४ मे २०२२ ते ९ मे २०२२ दरम्यान खुला होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ २ मे रोजी सुरु होणार आहे. एलआयसीमध्ये केंद्र सरकारची १०० टक्के मालकी, त्यातील ३.५ टक्के हिश्श्याची विक्री करणार आहे.4 / 12शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे LIC च्या IPO चे आकारमान कमी करण्यात आले. यापूर्वी सरकारकडून ५ टक्के शेअरची विक्री केली जाणार होती. मात्र, सुधारित प्रस्तावात सरकार ३.५ टक्के हिस्सा विक्री करणार आहे. 5 / 12या IPO त कर्मचारी, पॉलिसीधारक आणि गुंतवणूकदार यांना किती टक्के राखीव हिस्सा आणि सवलत असेल याची माहिती लवकरच जाहीर होणार आहे. 6 / 12बड्या गुंतवणूकदारांनी LIC ला जवळपास १३००० कोटींची आयपीओत गुंतवणूक करण्याची हमी दिल्याचे सांगितले जात आहे. LIC चे बाजार मूल्य ६ लाख कोटी असेल. 7 / 12त्याच्या प्रत्यक्ष मूल्यांकनाच्या तुलनेत हे १.१ पटीने अधिक आहे. एलआयसीचे मूल्यांकन सुधारित प्रस्तावाद्वारे सेबीकडे सादर करण्यात आले आहे. या आयपीओतून सरकारला २१००० कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.8 / 12यापूर्वी २०२१-२२ या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत सरकार LIC चा IPO आणणार होते. मात्र, अचानक उद्भवलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भांडवली बाजारात प्रचंड घसरण झाली होती. 9 / 12यामुळे LIC चा IPO लांबणीवर पडला होता. दोन महिने उलटले तरी अजूनही बाजारात स्थैर्य नाही. मात्र याबाबत अधिक वाट न पाहता सरकारने आयपीओबाबत पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 10 / 12LIC चा हा IPO भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा आयपीओ बनणार आहे. LIC ने फेब्रुवारी महिन्यात सेबीकडे आयपीओसाठी प्रस्ताव पाठवला होता. यात रिटेल गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचाऱ्यांना या आयपीओतून प्रति शेअर ४५ रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. 11 / 12पॉलिसीधारकांना प्रति शेअर ६० रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. LIC च्या IPO साठी प्राइस बँड ९०२ रुपये ते ९४९ रुपये रुपये ठरविण्यात आला आहे. 12 / 12तसेच LIC IPO एक लॉट १५ शेअरचा असणार आहे. सामान्य पॉलिसीधारकही या आयपीओतून शेअर्स घेऊ शकणार आहे. आता एलआयसीचे मूल्य ६ लाख कोटी रुपये एवढे रुपये एवढे निर्धारित करण्यात आले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications