Know What Happens If You Accidentally Transfer Money To Wrong Bank Account
Money Transfer : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यास कसे परत मिळतील? काय सांगतो RBIचा नियम? By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:02 PM1 / 8नवी दिल्ली : सध्या डिजिटल पेमेंटवर (Digital Payment) खूप भर दिला जात आहे. कोरोना संकटाच्या दरम्यान आणि नंतर डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या डिजिटल वॉलेट्स, NEFT / RTGS, UPI, Google Pay, BHIM अॅप आणि इतर सेवांद्वारे पैशांचे व्यवहार सहजपणे केले जात आहेत. 2 / 8हे सर्व माध्यम पैसे पाठवण्याचा किंवा प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. यामुळे, पैसे ट्रान्सफर करणे सोपे झाले आहे, परंतु हे करताना ग्राहकांकडून चुकाही होत आहेत. बर्याच वेळा, जेव्हा पैसे ट्रान्सफर करताना बँक खाते क्रमांक चुकीचा टाइप केला जातो, तेव्हा पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होतात. त्यामुळे चुकीच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर झाल्यास काय करावे? भारतीय रिझर्व्ह बँकचे (RBI)नियम काय आहेत? याबाबत जाणून घ्या...3 / 8जर चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर सर्वात आधी तुमच्या बँकेला फोन किंवा ईमेल द्वारे कळवा. तसेच, तुम्ही शाखा व्यवस्थापकाला शक्य तितक्या लवकर भेटल्यास चांगले होईल. फक्त ती बँक ही समस्या सोडवू शकते, ज्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. 4 / 8तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर सेंटरला फोन करा आणि त्यांना सर्व काही सांगा. जर बँकेने ई-मेलद्वारे सर्व माहिती मागितली तर व्यवहाराची संपूर्ण माहिती पाठवा. यामध्ये व्यवहाराची तारीख, वेळ, तुमचा खाते क्रमांक, पैसे कुठे पाठवले गेले, त्याचा खाते क्रमांक यासारखी माहिती द्यावी लागेल.5 / 8जर तुम्ही ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, खाते क्रमांक चुकीचा असेल किंवा IFSC कोड चुकीचा असेल, तर पैसे आपोआप तुमच्या खात्यात येतील. जर पैस खात्यात जमा झाले नसतील तर आपल्या बँकेत जा आणि शाखा व्यवस्थापकाला भेटा. त्यांना या चुकीच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती द्या. कोणत्या बँक खात्यात पैसे गेले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. 6 / 8जर चुकून दुसर्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले असतील तर पैसे परत मिळण्यास जास्त वेळ लागू शकतो. कधीकधी बँका अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी 2 महिन्यांपर्यंत लागू शकतात. तुम्ही तुमच्या बँकेकडून हे माहीत करू शकता की कोणत्या शहराच्या, कोणत्या शाखेत, कोणत्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत. तुम्ही त्या शाखेशी बोलून रक्कम काढू शकता.7 / 8चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, प्राप्तकर्ता पैसे परत करण्यास तयार असतो. जर त्याने पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. तुम्हाला अशा प्रकरणांमध्ये तुमच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बँकेत तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करू शकता.8 / 8आरबीआयने निर्देश दिले आहेत की, जर चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले तर तुमच्या बँकेला त्वरित पावले उचलावी लागतील. चुकीच्या खात्यातून योग्य खात्यात पैसे परत करण्याची व्यवस्था बँकेला करावी लागेल. सध्या पैसे ट्रान्सफर केल्यानंतर मोबाईल आणि मेल वर एक मेसेज येतो की जर व्यवहार चुकीचा असेल तर या फोन नंबरवर मेसेज पाठवा. याद्वारे तुम्ही तक्रारही दाखल करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications