शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जाणून घ्या काय असतं TAN Card; पॅन कार्डापेक्षा कसं असतं निराळं, कुठे भासते गरज?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 2:31 PM

1 / 6
TAN Card: पॅन कार्डबद्दल अनेकांना माहिती आहे. पण आज आम्ही तुम्हाला TAN कार्डबद्दल सांगत आहोत. TAN कार्डचे नाव ऐकून तुम्ही विचार करत असाल की हे काय आहे? सहसा अनेक लोक पॅन आणि टॅन कार्डमध्ये गोंधळात पडतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की पॅन कार्डपेक्षा TAN कार्ड किती वेगळे आहे? ते कुठे वापरले जाते, कोण जारी करते?
2 / 6
TAN चा फुल फॉर्म Tax Deduction and collection account Number हा असतो. ते प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात येते. हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. कर कपात करणार्‍या किंवा वसूल करणार्‍या सर्वांसाठी हे बंधनकारक आहे. टॅन वापरणे खूप महत्वाचे आहे. सोप्या शब्दात, पॅन करदात्यांसाठी बनविला जातो.
3 / 6
तर TAN कर कपात करणार्‍यांसाठी बनवला जातो. जे लोक कोणत्याही कामाच्या बदल्यात पैसे देतात, तर कर कापून पैसे देण्याची जबाबदारी त्या लोकांची आहे. तुमची कंपनी या श्रेणीत येते. हे लोक किंवा कर कपात करणार्‍या कंपन्यांना TAN बनवावा लागेल.
4 / 6
तुम्ही फॉर्म 49B द्वारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन TAN साठी अर्ज करू शकता. यासाठी 62 रुपये मोजावे लागणार आहेत. हे पेमेंट क्रेडिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा नेट बँकिंगद्वारे केले जाऊ शकते. जर तुम्हाला ते ऑनलाइन करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता.
5 / 6
परमनंट अकाउंट नंबर हा 10 अंकी कोड असतो. तो प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात येतो. सर्वसाधारणपणे नोकरदार लोकांना याची विशेष गरज असते. कार्डधारकांमार्फत होणाऱ्या देवाण घेवाणीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारकडून हे जारी केले जाते.
6 / 6
PAN म्हणजे परमनंट अकाउंट नंबर तर TAN म्हणजे टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर. ज्याचा कर कापला जातो किंवा जमा केला जातो. त्यांच्याकडे TAN क्रमांक असणे आवश्यक आहे. टीडीएसशी संबंधित सर्व कागदपत्रांसाठी आणि आयकर विभागाकडून टीडीएसशी संबंधित सर्व प्रकारांसाठी TAN क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सGovernmentसरकार