शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paytm ला Reserve Bank चा दणका; 'हे' काम त्वरित थांबवण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 8:33 AM

1 / 8
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) Paytm ला मोठा झटका दिला आहे. तसंच आपल्या एका सेवेसाठी नवे ग्राहक जोडणं तात्काळ बंद करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले. तसंच यामागे कोणतं कारण आहे हेदेखील रिझर्व्ह बँकेनं सांगितलंय.
2 / 8
पेटीएम पेमेंट्स बँक (Patm Payment Banks) प्लॅटफॉर्मवर नवे ग्राहक जोडणं त्वरित बंद करा असं पेटीएमला रिझर्व्ह बँकेनं निर्देश दिले. तसंच आपल्या या प्लॅटफॉर्मच्या आयटी सिस्टमचं ऑडिट करण्यासाठी एक आयटी फर्म नियुक्त करा असे आदेशही देण्यात आले आहेत.
3 / 8
कामकाजाच्या समिक्षेदरम्यान त्यांच्या काही देखरेखीसंबंधी चिंता समोर आल्या. याचा आधारवर हा निर्णय घेण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.
4 / 8
Paytm Payment's Bank ला पुन्हा नवीन ग्राहक जोडण्यासाठई मंजुरी देण्याचा निर्णय आता आयटी ऑडिटर्सच्या अहवालाच्या पडताळणीनंतर मिळणाऱ्या विशेष परवानगीवर अवलंबून असणार आहे.
5 / 8
रिझर्व्ह बँकेनं बँकिंग रेग्युलेश अॅक्ट १९४९ च्या कलम ३५ ए अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँकेला हे निर्देश दिले आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेची स्थापना ऑगस्ट २०१६ मध्ये करण्यात आली होती. तसंच यानं मे २०१७ औपचारिकरित्या आपलं कामकाज सुरू केलं होतं.
6 / 8
डिसेंबर २०२१ मध्ये पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्युल बँकेचा दर्जा मिळाला होता. शेड्युल बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँक सरकारी आणि अन्य मोठ्या कॉर्पोरेशनच्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजलमध्ये भाग घेऊ शकते, प्रायमरी ऑक्शनमध्येही सहभागी होण्याचीही संधी मिळेल.
7 / 8
याशिवाय त्यांना फिक्स्ड रेट, व्हेरिएबल रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीसाठीही भागीदार बनता येईल. यापूर्वी शुक्रवारी पेटीएमच्या शेअरमध्येही किंचित घसरण झाल्याचं दिसून आलं.
8 / 8
पेटीएमचा शेअर आता ७७४.८० रुपयांवर आला आहे. यापूर्वी पेटीएमच्या शेअर्समध्ये ४२ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण दिसून आली आहे. गेल्या महिनाभरात यामध्ये १० टक्क्यांची घसरण झाली आहे.
टॅग्स :Paytmपे-टीएमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक