Kotak Mahindra Bank now offers lowest home loan interest rate Check details home buyers
'ही' बँक देतेय सर्वात स्वस्त Home Loan; व्याजदर ६.६५ टक्क्यांपासून, पाहा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 10:57 AM1 / 15जर तुम्ही घर घेण्याच्या विचारात असाल आणि स्वस्त होमलोनच्या शोधात असाल तर कोटक महिंद्रा बँकेच्या विशेष ऑफरचा फायदा तुम्ही घेऊ शकता. 2 / 15कोटक महिद्रा बँकेने कन्सेशनल होमलोन पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 / 15कोटक महिंद्रा बँक या खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेनं यापूर्वी १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान होमलोनच्या व्याजदरात १० बेसिस पॉईंट्सची (bps) कपात करण्याची घोषणा केली होती. 4 / 15या कपातीनंतर होम लोनचे व्याजदर कमी होऊन ६.६५ टक्क्यांवर आले होते. दरम्यान, बँकेनं ही ऑफर ३१ मार्चनंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.5 / 15होम लोनची ही ऑफर बाजारातील अन्य बँकाच्या तुलनेत सर्वात स्वस्त ऑफर असल्याचा दावा बँकेनं केला आहे.6 / 15कोटक बँकेची ही ऑफर सर्व लोन खात्यांना लागू आहे. हे होमलोनचे व्याजदर ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअर आणि लोन टू व्हॅल्यूच्या प्रमाणात जोडले जातील. 7 / 15हे दर होमलोन आणि बॅलन्स ट्रान्सफर लोनवर लागू होणार आहेत. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. 8 / 15आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात स्वस्त ऑफरपैकी ही एक आहे. होमलोन घेण्यासाठी Kotak Digi Home Loans द्वारे अर्ज करता येऊ शकतो. तसंच यासाठी प्रोसेसिंग टाईमही कमी लागतो. 9 / 15'अलिकडच्या काही महिन्यांत घरांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आम्हाला आशा आहे की ही वाढ पुढेही कायम राहील, कारण लोकं त्यांच्या घरात राहण्यासाठी आणि घरातूनच काम करण्यास उत्सुक आहेत,' असं कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष (ग्राहक मालमत्ता) अंबुज चांदना म्हणाले.10 / 15अशा परिस्थितीत आम्ही घर खरेदी करणाऱ्यांना स्वस्त कर्जे देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे होम लोनचे व्याजदर ६.६५ टक्क्यांनी सुरू होतात, असंही त्यांनी सांगितलं. 11 / 15आम्ही दर्जेदार होमलोन बुक तयाक करण्याची एक संधी म्हणूनही याकडे पाहतो, असंही त्यांनी नमूद केलं.12 / 15३१ डिसेंबरपर्यंत कोटक महिंद्रा बँकेचे होमलोन अगेन्स्ट पॉपर्टी बुक (LAP) ४९,९७७ कोटी रूपये इतके होते. 13 / 15यापूर्वी बँकेनं ही ऑफर ३१ मार्च पर्यंत देण्याची घोषणा केली होती. तसंच ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं.14 / 15दरम्यान, इतर बँकांच्या तुलनेत कोटक महिंद्रा बँकेचे होमलोनचे व्याजदर कमी असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला होता.15 / 15मार्च महिन्यात अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना होमलोनच्या व्याजदरात कपात करून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications