KR Rail Engineering Ltd ₹16 share surprised everyone rs 1 lakh became rs27 lakh in a year
या ₹16 च्या शेअरनं सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का, एका वर्षात 1 लाखाचे झाले ₹27 लाख; आपल्याकडे आहे का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 3:39 PM1 / 7आज आम्ही आपल्याला एका अशाच स्टॉकसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यात गुंतवणूक करणारे अल्पावधीतच मालामाल जाले आहेत. हा शेअर K&R Rail Engineering Ltd चा आहे. या शेअरने गेल्या एका वर्षातच 2100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. 2 / 7या काळात हा शेअर 16 रुपयांवरून 361.75 रुपयांवर पोहोचला आहे. आज कंपनीचा शेअर 361.75 रुपयांवर ट्रेड करत आहेत. तसेच, 21 मार्चला हा शेअर 442.85 रुपयांवर पोहोचला होता.3 / 7शेअर प्राईस हिस्ट्री - K&R Rail Engineering Ltd च्या शेअर प्राईस हिस्ट्रीनुसार, गेल्या पाच वर्षांत या शेअरने 2,284.64% एवढा परतावा दिला आहे. या काळात 15 रुपयांवरून सध्याच्या प्राईसपर्यंत पोहोचला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 2100 टक्क्यांचा तगडा परतावा दिला आहे.4 / 7गेल्या सहा महिन्यात K&R Rail Engineering Ltd चा शेअर 26 रुपयांनी वाढून सध्याच्या प्राईसपर्यंत म्हणजेच 361.75 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात या शेअरने 1,267.67% एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. तसेच गेल्या एका महिन्यात 69.16% एवढा परतावा दिला आहे.5 / 7गुंतवणूकदार खुश - K&R Rail Engineering Ltd च्या शेअर प्राईस पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, ही रक्कम आज 22.60 लाख रुपयांवर पोहोचली असती. 6 / 7या शेअरची 52 आठवड्यांतील लो प्राईस 15.60 रुपये आहे. तसेच हाय प्राईस 442.85 रुपये आहे. महत्वाचे म्हणजे हा शेअर आपल्या हाय प्राईसवर 21 मार्चलाच पोहोचला होता. अर्थात 21 मार्चला शेअर प्राईसनुसार, गुंतवणूकदारांना वर्षभरातच एक लाखावर 27 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications