KYC can be done at home, big relief from RBI
आता बँकेतील हेलपाटे वाचणार; घरबसल्या करता येणार केवायसी, आरबीआयचा मोठा दिलासा By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 12:40 PM1 / 10मुंबई : बँकेत खाते असल्यास आणि वेळोवेळी केवायसी अपडेट करणे आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येकाला बँकेच्या शाखेत जावे लागते. यामुळे नाहक वेळ जातो. मात्र, आता केवायसी अपडेट करणे अतिशय सोपे झाले आहे.2 / 10रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ग्राहकांना दिलासा देत केवायसी अपटेड करण्याची सुविधा आता घरबसल्या करण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकेत जाण्याची कोणतीही गरज नाही.3 / 10आरबीआयने म्हटले की, बँक खातेधारकांनी वैध कागदपत्रे सादर केली असल्यास आणि त्यांच्या पत्त्यात कोणताही बदल केला नसल्यास बँक खातेधारकांना केवायसी अपडेटसाठी बँकेच्या शाखेत येण्याची आवश्यकता नाही. 4 / 10केवायसी तपशिलांमध्ये कोणताही बदल न झाल्यास खातेधारक त्यांच्या ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमाद्वारे स्वयं-घोषणा सादर करू शकतात.5 / 10केवायसी अपडेट करण्यासाठी बँकांनी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्यास भाग पाडू नये, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हे निर्देश दिले आहेत.6 / 10आरबीआयच्या म्हणण्यानुसार, ग्राहक ही सुविधा देणाऱ्या बँकांमध्ये व्हिडीओ कॉल करू शकतात. ग्राहक व्हिडीओ कॉलद्वारे नवीन केवायसी प्रक्रियादेखील पूर्ण करू शकतात. आरबीआयने ग्राहकांना केवायसी तपशील अपडेट करण्यासाठी उपलब्ध पर्यायांबद्दल अधिक तपशिलांसाठी त्यांच्या बँकेशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. 7 / 10आरबीआयने म्हटले आहे की जर बँक रेकॉर्डमधील कागदपत्रे ‘अधिकृतपणे वैध कागदपत्रांच्या’ सध्याच्या यादीशी जुळत नसतील तरच नवीन केवायसी प्रक्रिया सुरू केली जावी. पूर्वी सबमिट केलेल्या दस्तऐवजाची वैधता कालबाह्य झाली असल्यास नवीन केवायसीदेखील आवश्यक आहे.8 / 10आरबीआयने निर्देशांमध्ये बँकांना नोंदणीकृत ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम, डिजिटल माध्यम (ऑनलाइन बँकिंग/इंटरनेट बँकिंग, मोबाइल ॲप्लिकेशन), पत्र इत्यादीद्वारे ग्राहकांना स्वयं-घोषणा करण्याची सुविधा प्रदान करण्यास सांगितले आहे. 9 / 10त्यासाठी शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. पत्ता बदलल्यास, ग्राहक वरील कोणत्याही माध्यमातून सुधारित/अपडेट केलेला पत्ता देऊ शकतो, त्यानंतर बँक दोन महिन्यांच्या आत नवीन पत्त्याची पडताळणी करेल.10 / 10आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एका पत्रकार परिषदेत नुकतेच स्पष्ट केले होते की, बँकांनी ग्राहकांना शाखेत बोलावण्याचा आग्रह धरू नये. अनेक ग्राहकांनी त्यांच्या बँकांनी त्यांना ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी केवायसीसाठी शाखेत येण्यास सांगितले आहे, असे सांगितल्यानंतर गव्हर्नर दास यांनी हे स्पष्टीकरण दिले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications