शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 8:45 AM

1 / 7
LIC Lakhpati Scheme : सरकारी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे (LIC) गुंतवणूकीच्या अनेक स्कीम्स आहे. यात तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. या योजनांमध्ये विविध प्रकारची पॉलिसी बेनिफिट्स दिली जातात. यापैकी एक जीवन आनंद पॉलिसी त्याच्या फीचर्ससाठी आणि आकर्षक परताव्यासाठी खूप लोकप्रिय आहे.
2 / 7
केवळ ४५ रुपयांच्या गुंतवणुकीसह ही पॉलिसी २५ लाख रुपयांचा निधी उभा करण्यास मदत करते. यामुळे आर्थिक स्थैर्य शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना आकर्षक पर्याय ठरते.
3 / 7
पॉलिसीधारकांना मुदतपूर्तीच्या वेळी एकरकमी पुरेशी रक्कम मिळते, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रश्न सोडवण्यास मदत मिळते. केवळ ४५ रुपये किंवा मासिक १,३५८ रुपयांच्या प्रीमियमसह ३५ वर्षांच्या कालावधीसाठी जीवन आनंद पॉलिसी मिळू शकते.
4 / 7
या पॉलिसीमध्ये वेगवेगळे मॅच्युरिटी बेनिफिट्स मिळतात. हे पॉलिसीधारकांना त्यांच्या वैयक्तिक गरजा आणि उद्दीष्टं पूर्ण करण्यासाठी अनेक पर्याय देतं. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. विम्याची किमान रक्कम १ लाख रुपये आहे. कोणतीही निश्चित कमाल मर्यादा नाही. हे व्यक्तीला त्यांच्या आर्थिक गरजेनुसार पॉलिसी घेण्याचा पर्यायही देतं.
5 / 7
जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानं आपलं आर्थिक भवितव्य सुरक्षित होण्यास मदत होते. या गुंतवणुकीतून ३५ वर्षांच्या कालावधीत परतावा मिळतो.
6 / 7
दरमहा १,३५८ रुपये गुंतवून ३५ वर्षांत एकूण ५,७०,५०० रुपये जमा होतील. मॅच्युरिटीवर ८.६० लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि ११.५० लाख रुपयांचा अंतिम बोनस आणि ५ लाख रुपयांच्या विम्याची रक्कम मिळेल. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पॉलिसी कालावधीत बोनस दोनदा दिला जातो. परंतु यासाठी पॉलिसीचा कालावधी किमान १५ वर्ष असणं आवश्यक आहे.
7 / 7
जीवन आनंद पॉलिसी कर सवलतीचा लाभ देत नाही. परंतु, यात पॉलिसीधारकांना चार प्रकारचे रायडर्स दिले जातात. यामध्ये अॅक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी रायडर, अॅक्सिडेंट बेनिफिट रायडर, न्यू टर्म इन्शुरन्स रायडर आणि न्यू क्रिटिकल बेनिफिट रायडर यांचा समावेश आहे. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीच्या डेथ बेनिफिटच्या १२५ टक्के रक्कम मिळेल.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूक