शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टोयोटाच्या जन्माची गोष्ट, भूकंपातून मिळाली प्रेरणा; नेतेमंडळीची आवडती फॉर्च्युनर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 12:01 PM

1 / 11
आपल्याकडे राजकीय पुढाऱ्यांची पहिली पसंद असलेली कार म्हणजे टोयोटो फॉर्च्युनर. टोयोटा तसं पाहिलं तर जपानी कार आहे. मात्र, भारतात या कंपनीचे अनेक मॉडेल्स प्रसिद्ध आहेत.
2 / 11
टोयोटो कंपनीच्या नावाने एक रेकॉर्डही बनला आहे, जगभरात सर्वाधिक कार विकणारी कंपनी म्हणून टोयोटाचा नावलौकिक आहे. सन १०२६ साली कंपनीने तब्बल १ कोटी २ लाख गाड्यांची विक्री केली होती.
3 / 11
टोयोटाने २०१६ मध्येच फॉक्सवॅगन कंपनीला मागे सोडत प्रोडक्शनच्या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले होते. कोरोनाल ही टोयोटाची सर्वात सुरक्षित कार असून ही कार गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे. २००५ पर्यंत या कारचे तब्बल ३ कोटी युनिट विकण्यात आले होते.
4 / 11
प्रदीप ठाकूर यांचे पुस्तक असलेल्या टोयोटा सक्सेक स्टोरीमध्ये कंपनीच्या यशाचा प्रवास उलगडला आहे. त्यानुसार, एका भूकंपाच्या घटनेतून प्रेरणा घेत कंपनीची सुरुवात झाली होती.
5 / 11
१९२३ मध्ये जपानमध्ये आलेल्या भूकंपाने मोठा हादरा देशाला बसला, त्यात मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी, लोकांचे जीव वाचविण्यासाठी कारचा वापर करण्यात येत होता.
6 / 11
भूकंपाच्या या घटेनंतरच जपानच्या कार इंडस्ट्रीजने गती घेतली. टोयोटाचे संस्थापक किइचिरो यांनी यापासून प्रेरणा घेत 1932 एका कारचे प्रोटोटाइप मॉडेल AA 1932 बनवले. त्यानंतर, 1936 मध्ये त्यांनी टोयोटाची मुहूर्तमेढ रोवली.
7 / 11
टोयोटा आज आपल्या Production, Reliability आणि Safety साठी जगभरात नावलौलिक मिळवून आहे. कंपनीवर लोकांचा विश्वास 1951 पासूनत ठळकपणे बसला.
8 / 11
कंपनीने याच वर्षी टोयोटा लैंड क्रूजर मॉडल बाजारात उतरवले, ते जगभरात पंसतीस पडले. त्यानंतर, कंपनीने दरमहा केवळ 500 कारचे प्रोडक्शन करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने कार उत्पादनापेक्षा क्वालिटीवर अधिक फोकस केला. त्यामुळे, ब्रँडने विश्वास संपादित केला.
9 / 11
कंपनीने १९६३ मध्ये पहिल्यांदाच १० लाख एक्सपोर्ट करण्याचा विक्रम केला. १९९१ पर्यंत कंपनीने अमेरिकेत १ लाखांपेक्षा अधिक कार आणि ट्रक विकल्या आहेत.
10 / 11
सद्यस्थितीत टेस्लानंतर टोयोटा हीच जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे. भारतात टोयोटा कार आणण्याचं क्रेडिट हे विक्रम एस किलोस्कर यांना जाते.
11 / 11
भारतात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये जी रथयात्रा काढली, त्यावेळी टोयोटोची कार वापरली होती. त्यामुळे या कारचे भारतात महत्त्व वाढले. सध्या राजकीय पुढाऱ्यांच्या आवडीची कारही टोयोटा फॉर्च्युनरच आहे. भारतात कंपनीचे कार मार्केटमध्ये ४ टक्के शेअर्स आहेत.
टॅग्स :ToyotaटोयोटाcarकारPoliticsराजकारणIndiaभारतEarthquakeभूकंप