learn how can you Online apply for PAN CARD at home Learn the process nsdl income tax
घरबसल्या करा PAN CARD साठी ऑनलाइन अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया By जयदीप दाभोळकर | Published: January 09, 2021 5:32 PM1 / 15भारतात आधारकार्ड आणि पॅन कार्ड एखाद्या व्यक्तीकडे असणं हे अनिवार्यचं आहे. आर्थिक देवाणघेवाणीसाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला कोणाकडेही जाण्याची गरज नाही. तुम्ही अवघ्या काही मिनिटांत घरबसल्याही पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता. पाहुया कसा करता येईल अर्ज.2 / 15पॅन कार्ड तयार करण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे ओळखपत्र, राहत असलेल्या पत्त्याचा आणि जन्मतारखेचा पुरावा असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला अनेक पर्याय दिले जातील. तुम्ही त्यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.3 / 15सर्वप्रथम तुन्हाला TIN-NSDL च्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर Services या पर्यायामध्ये PAN हे सेक्शन उपलब्ध आहे. त्यावर क्लिक करा किंवा थेट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या लिंकवरही क्लिक करू शकता. 4 / 15या ठिकाणी तुम्हाला अॅप्लिकेशन टाईपची माहिती द्यावी लागेल. भारतीय नागरिकांसाठी Form 49A भरावा लागतो. त्यानंतर कॅटेगरीमध्ये individual सिलेक्ट करावं लागेल.5 / 15यानंतर तुमचं नाव, जन्मतारीख, कॉन्टॅक्ट डिटेल्स अशी सर्व माहिती भरावी लागणार आहे.6 / 15त्यानंतर CAPTCHA कोड भरून सबमिटवर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुमचा टोक नंबर जनरेट होईल.7 / 15त्यानंतर तुम्हाला एका पानावर रिडायरेक्ट करण्यात येईल. त्या ठिकामी तुम्हाला तीन पर्याय दिसतील जे तुम्हाला पॅन कार्डसाठी सबमिट करावे लागतील.8 / 15तुम्ही e-KYC आणि e-sign चा वापर करून डिजिटली आपले डॉक्युमेंट्स सबमिट करू शकता. याव्यतिरिक्त तुम्हाला फिजिकली डॉक्युमेंट्स सबमिट करण्याचाही पर्याय आहे.9 / 15जेव्हा तुम्ही डॉक्युमेट सबमिशनची प्रोसेस कराल तेव्हा फॉर्ममधील सर्व बाबी भरा. त्या ठिकाणी दिलेल्या सूचनांचं पालन करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करा.10 / 15यानंतर तुम्हाला तुमच्या इन्कम सोर्सची माहिती द्यावी लागते. याव्यतिरिक्त तुम्हाला पत्ता आणि कॉन्टॅक्ट डिटेल्सही द्यावे लागतात.11 / 15पुढील स्टेपमध्ये तुम्हाला असेसिंग ऑफिसर निवडावं लागेल. याच पानावर तुम्हाला त्याच्याशी निगडित माहिती मिळेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही नेक्स्टवर क्लिक करा.12 / 15तुम्ही जे डॉक्युमेंट्स सबमिट केलेत त्याची माहिती या ठिकाणी द्या. उदा. ओळख पत्र, पत्त्याचा पुरावा आणि जन्मतारीख. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि सही अपलोड कारावी लागेल. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.13 / 15त्यावर एक १५ अंकी अॅक्नॉलेजमेंट नंबर असेल. त्या रिसिटवर सही करून NSDL कार्यालयात पाठवा. अॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर १५ दिवसांच्या आत ते पाठवणं आवश्यक आहे. 14 / 15सबमिट केल्यानंतर आणि शुल्क भरल्यांतर तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक असलेल्या फोनवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर आलेल्या रिसिटची प्रिंट घ्या. 15 / 15सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १५ दिवसांच्या आत तुम्हाला तुमचं पॅन कार्ड मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications