शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२२५० रुपयांच्या खासगी नोकरीसाठी सोडला IAS चा जॅाब, आज सांभाळतायत २.६० लाख कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 10:25 AM

1 / 8
आयएएसची सारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठीत पदाची नोकरी कोणाला आवडणार नाही. सरकारी घर, वाहन, सर्व सुविधा मिळतात. अशी नोकरी सर्वांनाच हवी असते, पण आयएएसची नोकरी सोपी नसते. खडतर UPSC परीक्षा आणि ट्रेनिंगनंतर हे पद मिळतं. एवढी खडतर परीक्षा आणि अशा स्थितीत कोणाला आयएएसची नोकरी सोडून खासगी नोकरी करावीशी वाटेल का?
2 / 8
एवढी सरकारी नोकरी सोडून खासगी नोकरी करण्याचा विचारही कोणी करणार नाही हे नक्की. पण आरसी भार्गव यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासगी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी खासगी नोकरी पत्करली.
3 / 8
लाइमलाइटपासून दूर राहणारे आरसी भार्गव मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आहेत. मारुतीमध्ये येण्यापूर्वी ते आयएएस अधिकारी होते. फक्त आयएएस नाही तर युपीएससी टॉपरही होते. भार्गव हे १९५६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
4 / 8
भार्गव यांनी अलाहाबाद विद्यापीठातून गणित विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्समध्ये मास्टर ऑफ आर्ट्सचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. १९५६ मध्ये त्यांनी परीक्षा दिली आणि टॉप केलं.
5 / 8
अनेक वर्षे आयएएस अधिकारी म्हणून काम केल्यानंतर एके दिवशी अचानक त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरी सोडून त्यांनी खासगी नोकरी पत्करली. पहिली नोकरी मारुती सुझुकीमध्ये होती. त्यावेळी त्यांचा पहिला पगार होता फक्त २२५० रुपये. सरकारी नोकरी सोडून खासगी नोकरी करणं हा सोपा निर्णय नव्हता, पण भार्गव यांनी आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलं.
6 / 8
१९८१ मध्ये ते मारुतीमध्ये रुजू झाले. एक कर्मचारी म्हणून कंपनीत रुजू होऊन भार्गव यांनी मॅनेजमेंटला आपल्या कामाने इतके प्रभावित केलं की काही वर्षांतच ते मारुती सुझुकीच्या संयुक्त उपक्रमाचे संचालक बनले. १९८५ मध्ये एमडी पदाची सूत्रं त्यांनी हाती घेतली. १९९७ पासून ते मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आहेत.
7 / 8
भार्गव मारुतीमध्ये रुजू झाले तेव्हा ते ४८ वर्षांचे होते, आज ते ८८ वर्षांचे आहेत. ४० वर्षात भार्गव यांनी कंपनीला नवीन उंचीवर नेलेय. जपानच्या सुझुकी कंपनीचे मालक ओसामू सुझुकी यांनी २०१५ मध्ये एका मुलाखतीदरम्यान भार्गव यांचं कौतुक केलं होतं. त्यांच्याशिवाय कंपनी भारतात यशस्वी झालीच नसती असं त्यांनी म्हटलं होतं.
8 / 8
जिथे त्यांचा पहिला पगार फक्त २२५० रुपये होता, आज ते दर महिन्याला १.५ कोटी पगार घेतो. भार्गव यांच्या नेतृत्वाखाली मारुतीनं प्रथमच १ लाख कोटी रुपयांच्या रेव्हेन्यूचा टप्पा ओलांडला आहे. भार्गव यांनी कंपनीचे मार्केट कॅप २.६० लाख कोटी रुपयांवर नेले आहे.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी