Let's spend! So hong kong government will give 1200 dollar each
होऊ दे खर्च! म्हणून सरकार सर्वांना देणार प्रत्येकी ९२ हजार रुपये By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 3:56 PM1 / 8गेल्या दोन महिन्यांत कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळामुळे चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. 2 / 8कोरोना विषाणूच्या प्रसाराचा फटका हॉंगकाँगलाही बसला आहे. कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने हाँगकाँगमध्ये मंदीसदृष्य वातावरण आहे. या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी हाँगकाँग सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 3 / 8हाँगकाँग सरकारने ७० लाख स्थानिक नागरिकांना प्रत्येकी १२०० डॉलर्स म्हणजेत तब्बल ९२ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. 4 / 8हाँगकाँगचे वित्तमंत्री पॉल चॅन यांनी अर्थसंकल्प सादर करताना याबाबतची घोषणा केली आहे. 5 / 8आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी एकूण १२० अब्ज हॉंगकाँग डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना रोख मदत केल्याने देशाच्या तिजोरीवर ७१ अब्ज हाँगकाँग डॉलरचा भार पडणार आहे. 6 / 8मात्र जनतेला देण्यात येणारी रक्कम लोकांकडून खर्च करण्यात येईल. त्यामुळे व्यवहार होऊन बाजारात तेजी येईल, अशी सरकारला अपेक्षा आहे. 7 / 8कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे अर्थव्यवस्थेवर आलेले संकट दूर करण्यासाठी हाँगकाँग सरकारने हा हटके मार्ग स्वीकारला आहे. 8 / 8आता या उपायामुळे हाँगकाँगच्या अर्थव्यवस्तेत नेमके काय सकारात्मक बदल होतात ते पाहावे लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications