शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त ७१३ रुपयांच्या प्रिमियमवर मिळवा २ लाख रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 6:56 PM

1 / 6
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC नं एक नवी पॉलिसी बाजारात आणली आहे. LIC BIMA JYOTI असं या नव्या पॉलिसीचं नाव आहे. एलआयसी बिमा ज्योती पॉलिसीमध्ये कर वजावट (Tax Benifit) आणि परताव्याची (Returns) हमी आहे.
2 / 6
एलआयसी बिमा ज्योतीमध्ये किमान हमी १ लाख रुपये इतकी आहे. तर त्यावरील मिळकत २५ हजारांच्या फरकाने वाढत जाते. म्हणजेच १.२५ लाख, १.५० लाख आणि २ लाख असा परतावा मिळू शकतो.
3 / 6
एलआयसी बिमा ज्योती पॉलिसी तीन महिन्यांच्या बाळापासून ते ६० वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीलाही सुरू करता येऊ शकते. पॉलिसी कमीत कमी १८ वर्ष तर जास्तीत जास्त ७५ व्या वर्षी मॅच्युअर होते.
4 / 6
एलीआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्ही दरमहा, दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा दरवर्षीच्या अखेरीस प्रिमिअम भरू शकता. तसंच दोन वर्ष प्रिमिअर भरल्यानंतर तुम्हाला पॉलिसी बंद देखील करता येऊ शकते. तुमची जमा झालेली राशी तुम्हाला परत मिळेल. याशिवाय या पॉलिसीच्या आधारावर तुम्हाला कर्ज देखील मिळू शकतं.
5 / 6
पॉलिसीची मुदत जेव्हा संपते तेव्हा तुम्हाला तुमची जमा झालेली राशी तर मिळतेच. पण त्यात वार्षिक पाच टक्के व्याज देखील जोडून मिळते.
6 / 6
उदाहरणार्थ 'अ' नाव्याच्या व्यक्तीनं १ लाखांच्या बेसिक रमकेसह २० वर्षांसाठी पॉलिसी सुरू केली. तर त्याला पुढील १५ वर्षांपर्यंत प्रिमिअम जमा करावा लागेल. यात दरमहा केवळ ७१३ रुपये भरावे लागतील. यात वार्षिक ५ हजार रुपये व्याज जोडले जाईल. जे २० वर्षात २ लाख इतके होईल. म्हणजेच पॉलिसीची मुदत संपल्यावर 'अ' नाव्याच्या व्यक्तीला जमा झालेली राशीतर मिळेलच. पण त्यासोबत २ लाखांचा अतिरिक्त फायदाही मिळवता येईल.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीbusinessव्यवसाय