शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC BIMA RATNA : LIC च्या या योजनेत गुंतवणूक करून मिळवा मोठी रक्कम, बोनस सोबत मनी-बॅकचाही लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 5:04 PM

1 / 6
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी आहे. भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं एलआयसीकडे निरनिराळ्या पॉलिसीही उपलब्ध आहेत.
2 / 6
अशीच एक पॉलिसी म्हणजे LIC BIMA RATNA योजना. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट, वैयक्तिक, बचत जीवन विमा योजना आहे. ही योजना गॅरंटीड बोनस देते आणि तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार आणि भविष्यातील गरजांनुसार त्यात गुंतवणूक करू शकता.
3 / 6
तुम्हाला २१ ते २५ टक्के रकमेचा लाभ तब्बल दोन वेळा मिळतो. मॅच्युरिटीवर, अंदाजे कॉर्पसपैकी फक्त ५० टक्के रक्कम उपलब्ध आहे. १५ वर्षांच्या कालावधीच्या योजनेसाठी १३ व्या आणि १४ व्या वर्षी, २० वर्षांच्या कालावधीच्या योजनेसाठी १८ व्या आणि १९ व्या वर्षी आणि २५ वर्षांच्या कालावधीच्या योजनेसाठी २३ व्या आणि २४ व्या वर्षी मनी बॅक उपलब्ध आहे.
4 / 6
५ वर्षांच्या प्रीमियमवर ५० रुपये प्रति हजार बोनस दिला जातो. ६ ते १० वर्षांसाठी केलेल्या गुंतवणुकीसाठी ५५ रूपयांचा बोनस उपलब्ध आहे आणि त्यानंतरच्या कालावधीपासून मॅच्युरिटीवर ६० रुपयांचा बोनस उपलब्ध आहे.
5 / 6
ही मर्यादित प्रीमियमसह गॅरंटीड एडिशन मनी बॅक योजना आहे, याचा अर्थ निश्चित बोनस मिळविण्यासाठी तुम्हाला थोड्या कालावधीसाठी प्रीमियम भरावे लागतील. बाजारातील जोखीमीप्रमाणे यात कोणतीही जोखीम नाही.
6 / 6
गुंतवणूकदारांना किमान ५ लाख रुपयांचे आश्वासन दिले जाते आणि कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. LIC BIMA RATNA पॉलिसी १५ वर्षे, २० वर्षे आणि २५ वर्षांसाठी घेतली जाऊ शकते आणि प्रीमियम अनुक्रमे ११ वर्षे, १६ वर्षे आणि २१ वर्षांसाठी भरले जातील. ही पॉलिसी घेण्यासाठी तुमचे वय ९० दिवस ते ५५ वर्षांच्या दरम्यान असावे.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीMONEYपैसा