शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC धमाका करण्यास सज्ज! मुकेश अंबानींच्या रिलायन्सला देणार धोबीपछाड; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 1:51 PM

1 / 9
केंद्र सरकारने LIC IPO चा ड्राफ्ट सेबीकडे सोपविला आहे. यामुळे एलआयसीच्या आयपीओच्या वाटेतील महत्वाचा भाग पूर्ण होत आला आहे. एलआयसी आयपीओमध्ये कंपनीची एकूण इक्विटी साईज ही ६३२ कोटी शेअर एवढी प्रचंड असणार आहे.
2 / 9
LIC पॉलिसीधारकांना याच्या १० टक्के शेअर मिळणार आहेत. एकूण शेअर्स पैकी सरकार ५ टक्के शेअर्स विकत आहे. हा आकडा ३१.६ कोटी एवढा आहे. यापैकी १० टक्के म्हणजे ३.१६ कोटींहून अधिक शेअर पॉलिसीधारकांसाठी राखीव असणार आहेत.
3 / 9
मागील चालु आर्थिक वर्षांत निर्गुंतवणुकीतून १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. सरकारने यात घट करून ७८ हजार कोटी रुपये केले आहेत. आतापर्यंत सरकारला निर्गुंतवणुकीतून केवळ १२ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.
4 / 9
अशा परिस्थितीत, लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारच्या सर्व आशा LIC IPO वर टिकून आहेत. मात्र, यातच आता एलआयसी आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला मागे टाकण्याच्या तयारीत आहेत, असे सांगितले जात आहे.
5 / 9
मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी LIC ची इंडियन एम्बेडेड व्हॅल्यू ५३९,६८६ कोटी रुपये होती. एलआयसीचा मार्केट कॅप यापेक्षा चार पट असू शकतो, असे सांगितले जात आहे. विमा कंपन्यांचे व्हॅल्यूएशन करण्याची पद्धत सर्व ठिकाणी सारखीच असल्याचे म्हटले आहे.
6 / 9
मीडिया रिपोर्टनुसार, एलआयसीची डॉलरमध्ये व्हॅल्यू सांगायची झाल्यास ७२ अब्ज डॉलर असल्याचे म्हटले आहे. यानुसार एलआयसीची मार्केट व्हॅल्यू चार पट असू शकते. असे झाल्यास LIC ची मार्केट व्हॅल्यू २८८ अब्ज डॉलर म्हणजे २२ लाख कोटी रुपये असू शकेल.
7 / 9
यानंतर LIC ही सर्वांत मोठी मूल्यवान कंपनी ठरू शकेल. आतापर्यंत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने हा खिताब कायम राखला होता. रिलायन्सचा मार्केट कॅप १६ लाख कोटी आहे. मात्र, LIC ची अशीच घोडदौड कायम ठेवल्यास एलआयसी मुकेश अंबानींच्या रिलायन्सला धोबीपछाड देत सर्वाधिक मूल्य असलेली मोठी कंपनी बनेल.
8 / 9
विमा सेक्टरबाबत बोलायचे झाल्यास डिसेंबर २०२१ पर्यंत HDFC Life एम्बेडेड व्हॅल्यू २९ हजार ५४० असून, मार्केट कॅप ४.२५ पटीने अधिक आहे. यासह ICICI Prudential Life Insurance चा मार्केट कॅप एम्बेडेड व्हॅल्यूच्या २.४६ पट असल्याचे सांगितले जात आहे. तर यानुसार, SBI Life Insurance चा मार्केट कॅप एम्बेडेड व्हॅल्यूच्या ३.२१ पट आहे.
9 / 9
दरम्यान, LIC च्या IPO मसुद्यानुसार, त्यातील ५० टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBs) राखीव असतील. याचा अर्थ असा की एकूण ३१,६२,४९,८८५ समभागांपैकी अर्धे म्हणजे सुमारे १५.८ कोटी समभाग QIB साठी बाजूला ठेवले जातील. त्याच वेळी, १५ टक्के शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येतील.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीMukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजार