शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC नं दाबलं सेल बटन, मारुती सुझुकीचे ४३ लाख शेअर्स विकले; १०५ कंपन्यांमधील हिस्सा केला कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 8:22 AM

1 / 6
LIC (LIC) ही देशांतर्गत इक्विटी मार्केटमधील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. यामुळे कंपनीचा प्रत्येक गुंतवणूकदार त्याच्यावर लक्ष ठेवून असतो. एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत 105 कंपन्यांमधील हिस्सा कमी केला. टॉप 10 शेअर्समध्ये, LIC ने सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.
2 / 6
या यादीत पहिले नाव देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे (Maruti Suzuki India) आहे. एलआसीने सप्टेंबर तिमाहीत मारुतीमधील 4.32 दशलक्ष समभागांची विक्री करून आपला हिस्सा 4.86 टक्क्यांवरून 3.43 टक्क्यांवर आणला. प्राइम डेटाबेस ग्रुपच्या मते, कंपनीला या विक्रीतून 3,814 कोटी रुपये मिळाले.
3 / 6
गेल्या सहा महिन्यांत मारुतीच्या शेअर्समध्ये २६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सेमीकंडक्टर चिप संकट कमी होणे आणि तेजीने वाढणाऱ्या मागणीमुळे कंपनीचे शेअर्स वाढले आहेत. सप्टेंबर तिमाहीत मारुतीचा निव्वळ नफा चार पटींनी वाढून 2,062 कोटी रुपये झाला आहे.
4 / 6
तर दुसरीकडे कंपनीचा महसूलही 46 टक्क्यांनी वाढून 29,930.80 कोटी रुपये झाला आहे. या यादीत सरकारी कंपनी पॉवरग्रीड दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स आठ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत या कंपनीचे 2452 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
5 / 6
एलआयसीने एनटीपीसीमध्येही काही नफा मिळवला आहे. या वर्षात आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांनी वधारले आहेत. एलआयसीने त्यात आपला हिस्सा 9.97 टक्क्यांवरून 8.61 टक्क्यांवर आणला आहे. एलआयसीने या कंपनीतील 2,066 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
6 / 6
त्याचप्रमाणे एलआयसीने सप्टेंबर तिमाहीत सन फार्मा, एचएएल, अल्ट्राटेक सिमेंट, सिमन्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बजाज ऑटोचे शेअर्स विकले. LIC ने सन फार्माचे 2356 कोटी रुपये, HUL चे 2033 कोटी रुपये, LAL चे 1940 कोटी, अल्ट्राटेक सिमेंट 1482 कोटी, सिमन्सचे 1435 कोटी, ब्रिटानियाचे 1235 कोटी आणि बजाज ऑटोचे 1005 कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकले.
टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीshare marketशेअर बाजारMaruti Suzukiमारुती सुझुकी