शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC IPOबद्दल मोठे अपडेट! सरकार व्हॅल्यूएशनमध्ये कपात करण्याच्या तयारीत, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 5:55 PM

1 / 9
LIC IPO Update: LIC IPO ची वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत आलेली मंदी आणि अस्थिरतेमुळे भारतीय बाजारपेठेतही अस्थिरता दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सरकार LIC IPO चे मूल्यांकन कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.
2 / 9
असे सांगितले जात आहे की सरकार LICचे मूल्यांकन सुमारे 30 टक्क्यांनी कमी करू शकते. बाजारातील मंदीच्या वातावरणात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार हा निर्णय घेऊ शकते.
3 / 9
लाइव्ह मिंटच्या बातमीनुसार, सरकार एलआयसीचे मूल्यांकन सुमारे 11 लाख कोटी रुपये ठेवू इच्छित आहे, यापूर्वी 16 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन नियोजित होते. विशेष म्हणजे, मूल्यांकनात कपात झाली असली तरी हा देशातील सर्वात मोठा IPO ठरेल.
4 / 9
सरकारने मार्च 2022 मध्ये IPO आणण्यासाठी सर्व तयारी केली होती, परंतु बाजारातील वातावरणामुळे हा पुढे ढकलण्यात आला.
5 / 9
सरकार मूल्यांकन का कमी करत आहे?- तज्ज्ञांच्या मते, बाजारातील स्थिती पाहता गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार हे पाऊल उचलत आहे.
6 / 9
सरकारच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना नफा सूचीबद्ध होण्याची शक्यता वाढेल. भारतीय बाजारातील एफपीआयमध्येही घट झाली आहे.
7 / 9
एलआयसीने नुकतेच फेब्रुवारीमध्ये बाजार नियामकाकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली होती. या मसुद्यानुसार, LIC च्या एकूण 632 कोटी शेअर्सपैकी 31,62,49,885 इक्विटी शेअर्सची विक्री करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) राखीव असतील, तर 15 टक्के गैर-संस्थात्मक खरेदीदारांसाठी असतील.
8 / 9
12 महिन्यांसाठी वैध- आता LIC IPO ला SEBI ने मंजूर केल्यानंतर, हा IPO मंजुरीच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या कालावधीसाठी वैध आहे. LIC IPO संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये ऑटोमॅटिक मार्गाने थेट विदेशी गुंतवणुकीला (FDIE) 20 टक्क्यांपर्यंत परवानगी देण्यात आली होती.
9 / 9
या निर्णयानंतर LIC च्या प्रस्तावित IPO मध्ये विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, बाजारातील ढासळलेले वातावरण पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून आपले पैसे काढण्यास सुरुवात केली आहे.
टॅग्स :Lic IPOएलआयसी आयपीओLIC - Life Insurance CorporationएलआयसीCentral Governmentकेंद्र सरकार