शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC चा IPO देणार RIL आणि TCS ला धोबीपछाड? ‘या’ महिन्यात सेबीकडे प्रस्ताव सादर होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 2:32 PM

1 / 15
LIC च्या IPO ची गेल्या अनेक महिन्यांपासून खूपच चर्चा सुरू असून, गुंतवणूकदार या आयपीओची प्रतिक्षा करत आहेत. केंद्र सरकारही याबाबतची प्रक्रिया जलदगतीने राबवत आहेत.
2 / 15
गेल्या अनेक महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ उतार पाहायला मिळत असून, अनेकविध क्षेत्रातील सादर होत असलेल्या आयपीओमुळे गुंतवणूकदार मालामाल झाल्याचे दिसून आले. सन २०२२ मध्येही मोठ्या प्रमाणात IPO सादर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 15
आता, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या आयपीओ (IPO) ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. ती देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असेल, असा विश्वास होता, पण सरकार अपेक्षेपेक्षा खूपच कमी किमतीत त्याचे मूल्यांकन करू शकते.
4 / 15
असे झाल्यास देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस (TCS) नंतर एलआयसी ही देशातील तिसरी सर्वात मौल्यवान कंपनी ठरेल. LIC चे मूल्यांकन १० लाख कोटी रुपयांपेक्षा कमी असेल, असे म्हटले जात आहे.
5 / 15
आताच्या घडीला रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप १६ लाख कोटी रुपये आहे आणि टीसीएसचे १३.८ लाख कोटी रुपये आहे. कंजर्वेटिव्ह व्हॅल्यूएशननंतरही एलआयसीचा आयपीओ हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा इश्यू असेल.
6 / 15
पॉलिसीधारकांना आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, एलआयसी त्यांना सूट देऊन शेअर जारी करेल. भविष्यात सरप्लसच्या वितरणात बदल होणार असल्याने पॉलिसीधारकांनी सहभाग घ्यावा, अशी कंपनीची इच्छा आहे.
7 / 15
विमा उद्योगाच्या सूत्रांनुसार, एलआयसीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेची (AUM) खाजगी कंपन्यांच्या मालमत्तेशी तुलना करणे योग्य नाही. कारण एलआयसीच्या निधीचा मोठा भाग गॅरंटीड रिटर्न प्लॅन, ग्रुप इंशोरन्स फंड्स आणि कर्मचारी सेवानिवृत्ती निधीचा आहे.
8 / 15
या व्यवसायात मार्जिन खूपच कमी आहे. सध्या स्टेट ऑफ इंडियाच्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे मार्केट कॅप १.२ लाख कोटी रुपये आहे, तर तिची एयूएम २.४ लाख कोटी रुपये आहे. अॅक्चुरियल फर्म मिलिमनने एलआयसीच्या एम्बेडेड मूल्यावर आपला अहवाल सादर केला आहे, ज्याच्या आधारावर आयपीओसाठीची किंमत ठरवली जाईल.
9 / 15
दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत LIC चा IPO येण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. सरकारी कंपन्यांची देखभाल करणाऱ्या केंद्राच्या गुंतवणूक विभागाने या वृत्ताचे खंडन केले आहे.
10 / 15
मात्र, LIC चा IPO कधी येणार, याबाबतची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दीपमने म्हटले आहे की, एलआयसीचा आयपीओ या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत आणण्याची योजना आहे आणि त्यासाठी तयारी सुरू आहे.
11 / 15
LIC चे मूल्यांकन करण्यात आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ जात आहे आणि म्हणूनच त्याच्याशी संबंधित औपचारिकता पूर्ण झालेली नाही. याव्यतिरिक्त, एलआयसीचे मूल्यांकन पूर्ण करण्यात अनेक समस्या येत आहेत.
12 / 15
मर्चंट बँकरसह काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. जरी LIC चे मूल्यांकन झाले, तरी देखील नियामकशी संबंधित अशा अनेक प्रक्रिया आहेत, ज्या आयपीओच्या आधी पूर्ण कराव्या लागतात.
13 / 15
मूल्यांकनानंतर एलआयसीच्या शेअर विक्रीचा आकार निर्धारित केला जाऊ शकतो. भारतात कंपनी शेअर बाजारमध्ये सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया इतकी जटिल आहे की, एलआयसीचे मूल्यांकन पूर्ण केल्यानंतरही उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन ते चार महिने लागू शकतात.
14 / 15
LIC जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. त्याच्या मूल्यांकनात अनेक समस्या येत आहेत, कारण त्याची मोठी आकार असलेली उत्पादने, रियल स्टेट अॅसेट, सहयोगी कंपन्या आणि नफ्याचे वाटप करण्याच्या संरचना खूप जटिल आहेत.
15 / 15
त्यामुळेच LIC चा IPO चालू आर्थिक वर्षात येण्याची शक्यता जवळपास नाही, असा दावा मर्चंट बँकरशी संबंधित एका अधिकाऱ्याने केला आहे. भारत सरकार LIC आणि बीपीसीएलद्वारे १.७५ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण करू इच्छित आहे.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजार