शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC IPO : या पॉलिसीधारकांना नाही मिळणार एलआयसी आयपीओमध्ये सूट; तुमच्याकडे आहे का? तपासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 3:56 PM

1 / 8
पुढील महिन्यात एलआयसीचा आयपीओ येत आहे. या आयपीओची महत्वाची बाब म्हणजे एलआयसीचे सामान्य पॉलिसीधारक देखील हे शेअर खरेदी करू शकणार आहेत. त्यांच्यासाठी लाखो शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहे. असे असले तरी काही पॉलिसीधारकांना पॉलिसी असूनही शेअर्सवर सूट मिळणार नाही. एलआयसीनेच हे स्पष्ट केले आहे.
2 / 8
यामध्ये पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आहे. या योजनेच्या पॉलिसीधारकांना एलआयसी आयपीओमध्ये (LIC IPO) कोणताही सूट दिली जाणार नाहीय. याचे कारणही एलआयसीने दिले आहे.
3 / 8
पीएमजेजेबीवाय (PMJJBY) ही एक ग्रुप इन्शुरन्स प्रॉडक्ट आहे. यामुळे यात असलेले पॉलिसीधारकांना शेअर्सवर डिस्काऊंट मिळणार नाहीय. दोन दिवसांपूर्वीची एलआयसीचे अध्यक्षांची घोषणा एलआयसी पॉलिसीधारकांनी खोडून काढली आहे.
4 / 8
एम आर कुमार (LIC Chairman) यांनी म्हटलेले की, पीएमजेजेबीवाय योजनेतील पॉलिसीधारकांना देखील आयपीओमध्ये सूट मिळणार आहे. त्यांचा देखील हक्क आहे. मात्र, कंपनीने त्यांनी हे अज्ञानातून म्हटले होते, अशी सारवासारव केली आहे.
5 / 8
IPO सुलभ करण्यासाठी, LIC चे भागभांडवल गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 100 कोटी रुपयांवरून 6325 कोटी रुपये वाढविण्यात आले होते. 13 फेब्रुवारी रोजी बाजार नियामक सेबीकडे दाखल केलेल्या डीआरएचपीने सांगितले की, अंदाजे 63,000 कोटी रुपयांसाठी सरकारचा 5 टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव आहे.
6 / 8
IPO साठी गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुद्यानुसार, LIC च्या पात्र विमाधारकांना IPO मध्ये आरक्षण दिले जाईल. या अंतर्गत, प्रति व्यक्ती कमाल बोली रक्कम दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
7 / 8
ज्यांच्याकडे बोली उघडण्याच्या तारखेनुसार एक किंवा अधिक LIC पॉलिसी आहेत आणि जे भारताचे रहिवासी आहेत ते पॉलिसीधारक आरक्षणांतर्गत अर्ज करू शकतात. असे दिलेले आरक्षण IPO च्या आकाराच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
8 / 8
आत्तापर्यंत LIC च्या 60-70 लाख पॉलिसीधारकांनी त्यांच्या वेबसाइटवर त्यांचे पॅन कार्ड अपडेट केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून, पॉलिसीधारक त्यांचे पॅन कार्ड पॉलिसीसह वेगाने अपडेट करत आहेत.
टॅग्स :Lic IPOएलआयसी आयपीओLIC - Life Insurance Corporationएलआयसी