LIC IPO See when LICs IPO will come and what will be the benefit to the policy holders
LIC IPO: पाहा केव्हा येणार एलआयसीचा आयपीओ आणि काय फायदा होणार पॉलिसी धारकांना By जयदीप दाभोळकर | Published: February 03, 2021 1:58 PM1 / 10भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात हा आयपीओ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.2 / 10जर तुमच्याकडे एलआयसीची पॉलिसी असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एलआयसीच्या पॉलिसी धारकांसाठी १० टक्के आयपीओ आरक्षित असणार आहे. 3 / 10केंद्रीय अर्थमंत्रालयातील गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना १० टक्के आयपीओ हा पॉलिसी धारकांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 4 / 10किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी कंपनीच्या आयपीओमध्ये १० टक्क्यांचं आरक्षण मिळतं संच एलआयसीच्या पॉलिसी धारकांसाठीही देण्यात येणार आहे. केवळ सरकारनंच का एलआयसीचा मालकी हक्क ठेवावा. एलआयसीचे पॉलिसी धारकही त्याचे मालक बनले पाहिजेत, असं पांडे म्हणाले.5 / 10एलआयसी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. याचा आयपीओ ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. 6 / 10कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बसलेल्या जबर फटक्यातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि प्रकल्पांच्या आर्थिक मदतीसाठी निर्गुतवणूकीद्वारे सरकारनं १.७५ लाख कोटी रूपये जमवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.7 / 10सरकार एलआयसीच्या आयपीओसह शिपिंग कॉर्पोरेश ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक लिमिटेड आणि अन्य दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचीही विक्री करण्याच्या विचारात आहे. 8 / 10तुहिनकांत पांडे यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने वित्त विधेयकाद्वारे भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि आयडीबीआय बँक मधील भागभांडवलाच्या निर्गुंतवणुकीसाठी आवश्यक कायदेशीर दुरुस्त्या सादर केल्या आहेत.9 / 10अर्थव्यवस्थेला बसलेल्या मोठ्या फटक्यातून सावरण्यासाठी मोदी सरकारनं पुढील आर्थिक वर्षात विक्रमी भांडवली खर्चाचे लक्ष्य ठेवलं आहे. 10 / 10भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि एअर इंडियाच्या संभाव्य खरेदीदारांकडून सरकारला ईओआयदेखील मिळाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications