शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC Jeevan Anand Policy: रोज करा ८० रुपयांची गुंतवणूक आणि मिळतील १० लाख, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 4:32 PM

1 / 8
जीवन बीमा ग्राहकांसाठी नवीन योजना लाँच करत असते. ग्राहकांचे भविष्य सुरक्षेसाठी अनेक पॉलिसी ऑफर करत असते. ही पॉलिसी छोट्या गुंतवणूकीवरीह मोठा फायदा देत असते.
2 / 8
एलआयसीच्या पॉलिसीमध्ये जीवन आनंद पॉलिसी ही फायद्याची पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये ग्राहकांना १०० रुपयांपासून ते १० लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी अनेक फायद्यासह डबल बोनसचा फायदाही देते.
3 / 8
एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तु्म्हाला रोज ८० रुपयांची बचत करावी लागणार आहे. १८ वर्षा पुढील व्यक्ती या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकतो.
4 / 8
एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्हाला वर्षाला २७ हजार रुपये प्रीमियम पद्धतीने द्यावे लागतात, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला २,३०० रुपये द्यावे लागणार आहेत. याचे रोजचे कॅलक्युलेशन केले तर तुम्हाला रोज ८० रुपये द्यावे लागणार आहेत. तुम्हाला २१ वर्षात ५.६० लाख रुपये भरावे लागणार आहेत. याचे मॅच्युरिटीमध्ये १० रुपये होतात.
5 / 8
एलआयसी जीवन आनंद पॉलिसी मुदतपूर्तीच्या वेळी परतावा म्हणून एक निश्चित रक्कम देते. जीवन आनंद पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यावर, गुंतवणूकदारांना 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा आणि 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनल बोनस मिळतो.
6 / 8
तुमचा नफा दुप्पट करण्यासाठी, तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. तरच तुम्हाला बोनस दुप्पट करण्याचा अधिकार मिळेल.
7 / 8
हे फायदे एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये देखील समाविष्ट आहेत, एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यू, अपंगत्व, मुदतीची हमी आणि गंभीर आजार इत्यादींसाठी विमा संरक्षण समाविष्ट आहे.
8 / 8
याशिवाय, पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, विमा रकमेच्या १२५% रक्कम नॉमिनीला जाईल.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूक